🛑नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना करणे बाबत.- आजरा उबाठा शिवसेनेचे निवेदन.
🛑बहिण-भावांच्या नात्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे.- मंत्री. मुनगंटीवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा, चंदगड, गडहिंगलज, मुरगूड, भुदरगड नगरपालिका व नगर परिषद दरम्यान दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, मलप्रभा, तिलारी, मार्कंडेय, चित्री या नद्यांच्या उगमकडील सुरवातीचा प्रदेश आहे. या परिसरात उत्तम पर्जन्यमान असून धरणामध्ये पाण्याचा पुरेसा साठा नियमित आहे. तरीही उन्हाळ्यात सदर सर्व नद्या प्रदूषित झालेल्या दिसून येत आहेत. त्याची कारणे सकृत दर्शनी खालील प्रमाणे आहेत. याबाबतचे निवेदन शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे यांच्या नेतृत्वाखालील विभागीय आयुक्त पुणे. जिल्हाधिकारी कोल्हापूर.
नगर पंचायत प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यलय, कोल्हापूर., प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर.
कार्यकारी अभियंता जल संपदा विभाग (दक्षिण) कोल्हापूर. यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
१) आजरा, चंदगड, गडहिंगलज, मुरगूड, भुदरगड नगरपालिका व नगर परिषद हद्दीत तयार होणारे नागरी सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात सोडले जाते, परिणामी नद्या तीव्र प्रदूषित होतात.
२) आजरा, चंदगड, गडहिंगलज, मुरगूड, भुदरगड नगरपालिका व नगर परिषद हद्दीत तयार होणारे नागरी घन कचरा डिसेंबर २०१६ चे घन कचरा व्यवस्थापन कायद्या नुसार प्रक्रिया व विल्हेवाट केला जात नाही. परिणामी सदर कचरा व त्यातून तयार होणारे लीचेट थेट नदी, नाल्यात जावून पाणी प्रदूषणाची तीव्रता वाढत जाते. ३) आजरा, चंदगड, गडहिंगलज, मुरगूड, भुदरगड नगरपालिका व नगर परिषद हद्दीत मटण, चिकन, मासे याची ठीक ठिकाणी विक्री होत असून त्यातून निर्माण होणारा धन व द्रव कचरा हा कायद्यातील तरतुदीनुसार प्रक्रिया व विल्हेवाट केला जात नाही. परिणामी सदर कचरा व त्यातून तयार होणारे लीचेट व थेट कचरा नदी, नाल्यात जावून पाणी प्रदूषणाची तीव्रता वाढत जाते. ४) आजरा, चंदगड, गडहिंगलज, मुरगूड, भुदरगड नगरपालिका व नगर परिषद हद्दीत असणारे सर्व वैद्यकीय व्यवसायातून तयार होणारा घन कचरा व द्रव कचरा व्यवस्थापन कायद्या नुसार प्रक्रिया व विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाची स्वतंत्र प्रक्रिया प्रकल्प असणे आवश्यक असून तो उभारला नाही. सबब अशा वैद्यकीय व्यवसायिकांची यादी, निर्माण होणारा कचरा व त्यावरील प्रक्रिया या बाबींची माहिती प्रशासनाकडे नाही. या सर्व बाबी पाणी, जमीन, वायू प्रदूषणाचे कारण ठरत आहेत.५) आजरा, चंदगड, गडहिंगलज, मुरगूड, भुदरगड नगरपालिका व नगर परिषद हद्दीत असणारे सर्व हॉटेल, उद्योग, हॉस्पिटल, मंगल कार्यालय, यात्री निवास, फेरीवाले, सर्व्हिसिंग सेंटर, कॅटरिंग व्यवसायिक यांचे कडून तयार होणाऱ्या घन, द्रव कचरा व्यवस्थापन करणेची जबाबदारी सदर व्यावसायिकांची असून त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून होत नाही, परिणामी सर्व प्रकारच्या प्रदूषणात भर पडत आहे. ६)सदर कामात पूरक असणाऱ्या जैव विविधता संवर्धन समिती, वृक्ष प्राधिकरण समिती, ७) सिटी लेव्हल मॉनिटरिंग कमिटी यांची निर्मिती व पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाहीत.
८) सदर सर्व बाबींच्या अनुशंगाणे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा यादृष्टीने प्रस्ताव तयार झालेले नाहीत.
९) वरील नमूद नद्यांचे पाणी कायम प्रवाहित राहण्यासाठी, पूर नियंत्रण करणेसाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. वरील सर्व मुद्दे विचारात घेवून जमीन, शेती, नदी, पाणी, हवा याचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे.
सदर बाबतीत ज्या उपाय योजना करण्यात आल्या, त्यांची सद्यस्थिती, प्रस्तावित प्रकल्प आदींची माहिती तातडीने मिळावी. वरील सर्व मुद्दे विचारात घेवून तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा न्यायालयीन प्रक्रिया व जन आंदोलनाच्या मार्गाने लढा सुरू करण्याची सूचना या निवेदनाच्या द्वारे देत आहोत.असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, शांताताई जाधव महिला जिल्हासंघटक, संभाजी पाटील उपजिल्हा प्रमुख ता. प्रमुख राजेंद्र सावंत, युवराज पोवार, अवधूत पाटील युवा सेना जिल्हाप्रमुख, आनंद भोपळे शिव अरोग्या प्रभुत्व, ओमकार माध्याळकर शहर प्रमुख युवासेना महेश पाटील , वहातुक सेना राजु बडगर, सह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
बहिण-भावांच्या नात्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे.- मंत्री. मुनगंटीवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल.
आजरा.- प्रतिनिधी.

जालना येथे झालेल्या प्रचारसभेत बहिण-भावांच्या नात्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे भाजपाचे नेते आणि राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तातडीने कडक कारवाई करणेबाबत महाविकास आघाडी आजरा यांनी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
काल जालना येथे झालेल्या प्रचारसभेत भाजपाचे नेते आणि राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी बहिण-भावाच्या पवित्र नात्याबद्दल आत्यंतिक खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ भाषेत टीका केली. यातून त्यांच्या हीन मनोवृत्तीचं दिसून आली. महाराष्ट्र ही स्त्रियांचा आदर करणारी, त्यांना सन्मान देणे संतांची, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची भूमी आहे. इथे कधीही विरोधी विचारांच्या किंवा पक्षांच्या नेत्यावर, कार्यकर्त्यांवर अशी गलिच्छ आणि लाजेने मान खाली जाईल अशा भाषेत कधीच टीका झाली नाही. पण अलिकडे मात्र भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांनी याला काळिमा फासला आहे. काल जालना येथील जाहीर सभेत बोलतांना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा तोल गेला. भावा- बहिणीच्या पवित्र नात्याबद्दल अत्यंत हीन शब्दात त्यांनी कोंग्रेसच्या कार्यकर्त्यावर टीका केली. याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर २९४ कलमा अंतर्गत कडक कारवाई तातडीने करण्यात यावी अन्यथा लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल असा इशारा आम्ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने देत आहोत. यावेळी महाविकास आघाडी पदाधिकारी मुकुंददादा देसाई
संभाजी पाटील, काॅ. संपत देसाई
अभिषेक शिंपी, संतोष मासोळे
रशिद पठाण, युवराज पोवार
अनिल देसाई सह पदाधिकारी उपस्थित होते.