HomeUncategorizedटीबी'च्या औषधांचा तुटवडा.-तीन महिने औषधे मिळणे मुश्किल.- रुग्णांसाठी कसोटीचा काळ🟥लोकांच्या जीवाशी खेळ...

टीबी’च्या औषधांचा तुटवडा.-तीन महिने औषधे मिळणे मुश्किल.- रुग्णांसाठी कसोटीचा काळ🟥लोकांच्या जीवाशी खेळ करता.- रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांचा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळला.🛑☔यावर्षी मान्सून समाधानकारक राहणार.-स्कायमेटचा अंदाज

🛑’टीबी’च्या औषधांचा तुटवडा.-
तीन महिने औषधे मिळणे मुश्किल.- रुग्णांसाठी कसोटीचा काळ
🟥लोकांच्या जीवाशी खेळ करता.- रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांचा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळला.
🛑☔यावर्षी मान्सून समाधानकारक राहणार.-
स्कायमेटचा अंदाज

मुंबई – प्रतिनिधी.

राज्यासह देशामध्ये क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, केंद्र सरकारने पुढील काही महिने औषध तुटवड्याचे संकट राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यापाठोपाठ राज्य सरकारांना स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र औषध उत्पादन, त्याचे वितरण व औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान तीन महिने लागणार असल्याने पुढील तीन महिने क्षयरुग्णांना नियमित औषधे मिळणे मुश्किल होणार आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी कसोटीचा काळ ठरणार आहे.
🅾️राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरोग रुग्णांना ‘३ एफडीसी ए’ ही औषधे राष्ट्रीय स्तरावर पुरविण्यात येतात. मात्र मागील काही महिन्यांपासून राज्यासह संपूर्ण देशामध्ये क्षयरोग औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान तीन महिने लागण्याची शक्यता आहे. ‘३ एफडीसी ए’ या औषधाचा तुटवडा निर्माण झाला असून, हे औषध विशेषत: नव्याने सापडणाऱ्या क्षयरोग रुग्णांना देण्यात येते. नव्याने सापडणाऱ्या क्षयरोग रुग्णांना सुरुवातीला दोन महिने ‘४ एफडीसी ए’ हे औषध दिले जाते त्यानंतर दोन महिन्यांनी ‘३ एफडीसी ए’ हे औषध देण्यात येते. त्यामुळे मागील तीन ते चार महिन्यांमध्ये सापडलेल्या रुग्णांना आता ‘३ एफडीसी ए’ हे औषध देण्याची वेळ आली आहे. मात्र त्यांना हे औषध न मिळाल्यास त्यांच्यामध्ये बहुऔषध-प्रतिरोधक क्षयरोग (एमडीआर – टीबी) वाढीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रुग्णांमधील क्षयरोग अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी, भारत २०२५ पर्यंत क्षयमुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या उद्दिष्ट्यात अडथळा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

मुंबईसह राज्यातील साधारणपणे दोन लाखांपेक्षा अधिक रुग्णांना औषध तुटवड्याला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईमध्ये प्रत्येक महिन्याला साधारणपणे पाच हजार नवे रुग्ण सापडतात. त्यामुळे नव्याने सापडणाऱ्या या रुग्णांना, तसेच यापूर्वी उपचार सुरू असलेल्या रुग्णांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यता असल्याची माहिती क्षयरोग कार्यकर्ता गणेश आचार्य यांनी दिली.
🟥औषध उत्पादक कंपनीला ‘३ एफडीसी ए’ या संयुक्तिक औषधांची निर्मिती करून त्याचे देशातील प्रत्येक केंद्रावर नियमित वितरण करण्यासाठी साधारणपणे तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनेही औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले आहे.
गणेश आचार्य, क्षयरोग रुग्ण कार्यकर्ता

🟥लोकांच्या जीवाशी खेळ करता.- रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांचा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळला.

नवी दिल्ली – वृत्तसंस्था.

सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदचे सहसंस्थापक रामदेव बाबा आणि व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांना दणका दिला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. पण न्यायालयाने त्याचा माफीनामा फेटाळला आहे. ‘या प्रकरणात आम्ही उदारता दाखवणार नाही. तसेच या प्रकरणात केंद्र सरकारने दाखल केलेले उत्तरही समाधानकारक नाही. माफी कागदावर मागितली आहे. यामुळे आम्ही ती फेटाळून लावतोय. जाणूनबुजून उल्लंघन केले आहे. यामुळे परिणामांसाठी तयार राहा’, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती ए अमानुल्लाह यांच्या पीठाने फटकारले आहे. ‘आम्ही आंधळे नाही. सगळं दिसतंय’, असेही न्यायालयाने सुनावले. या प्रकरणी आता 16 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.
🟥न्यायालयाला दिलेल्या वचननाम्याचे उल्लंघन करून दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय जाहिरातींचे प्रकाशन केल्याने रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमाननेचा खटला सुरू आहे. या प्रकरणी आज सुनावणी झाली. ‘प्रकरण न्यायालयात येत नाही तोपर्यंत अवमान करणाऱ्यांनी माफीनामा पाठवला नाही. त्यांनी तो आधी मीडियाला दिला. रात्री साडेसात वाजेपर्यंत तो आमच्याकडे अपलोड झालेला नव्हता. ते प्रचारावर विश्वास ठेवतात, हे स्पष्ट आहे’, असे म्हणत न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी पतंजलीच्या संस्थापकांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. ‘या प्रकरणी त्यांनी बिनशर्त माफी मागितली आहे’, असे रोहतगी यांनी सांगितले.
🅾️‘या प्रकरणात परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी अवमानना करणाऱ्यांशी हातमिळवणी केली होती. आता संबंधित तीन अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांनी कंपनीला इशारा देऊन सोडून दिले होते. पण 1954 च्या कायद्यानुसार इशारा देण्याची आणि गुन्हा कमी करण्याची कुठलीही तरतूद नाहीये. यातून एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाची खिल्ली उडवली गेली. तुम्ही कायदेशीर सल्ला घेतला होता का? हे लज्जास्पद आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने नमूद केले. ‘तुम्ही लोकांच्या जिवाशी खेळत आहात. जेव्हा लोक ही औषधे घेत होते आणि त्यांना फसवले जात होते तेव्हा तुम्ही काय केले?’ असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड सरकारच्या प्रशासनाला केला
.

🌨️☔यावर्षी मान्सून समाधानकारक राहणार.-
स्कायमेटचा अंदाज

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.

मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता, त्यामुळे अनेक भागात सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागात पाण्याची समस्या आहे. मात्र, यंदाच्या मान्सूनमध्ये यापासून दिलासा मिळणार आहे. कारण, यंदा मान्सूनमध्ये चांगला आणि सरासरीप्रमाणे सामान्य पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
🟣स्कायमेट वेदर या हवामानाचा अंदाज देणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार, यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे. नेहमीच्या सरासरी च्या 102 टक्के म्हणजे सर्वसाधारण पाऊस पडेल, असा स्कायमेट वेदरने वर्तवला आहे. एल निनोचं ला निनो मध्ये रुपांतर होत असल्याने महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त भागातही चांगल्या पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. मान्सून फोरकास्ट 2024′ या शीर्षकाच्या अहवालानुसार भारताच्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात अनुकूल पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारख्या मुख्य मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेल्या भागात पुरेसा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तर बिहार, झारखंड, ओडिसा, आणि पश्चिम बंगालसहित पूर्व राज्यांमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.
🅾️स्कायमेटनुसार केरळ, कोकण, कर्नाटक आणि गोव्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. देशाच्या मध्य भागात सामान्य पाऊस होणार आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांच्या मतानुसार, अल निनो जलद गतीने ला नीनामध्ये बदलत आहे. ला नीना वर्षांमध्ये मान्सूनमध्ये मजबूतपणे रुपांतरीत होत आहे. सुपर एल निनोचे मजबूत ला निनामध्ये संक्रमण झाल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या चांगला मान्सून तयार झालाय. एल निनोच्या अवशिष्ट परिणामांमुळे नुकसान होण्याच्या जोखमीसह पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊ शकतो. देशभरात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय तापमान गरम होत आहे. तसा आता तापमानाचा पाराही हळूहळू वर चढत आहे. हवामान विभागाने काही राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याचबरोबर जवळपास ८ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.