HomeUncategorizedसागर चव्हाण हरपवडे .- या तरुणाचा मृतदेह मसोलीतील विहिरीत पाय घसरून पडल्याने....

सागर चव्हाण हरपवडे .- या तरुणाचा मृतदेह मसोलीतील विहिरीत पाय घसरून पडल्याने. 🛑आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी भरत हातकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन.

निधन वार्ता.

🛑सागर चव्हाण हरपवडे .- या तरुणाचा मृतदेह मसोलीतील विहिरीत पाय घसरून पडल्याने.
🛑आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी भरत हातकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन.

आजरा.- प्रतिनिधी.

हरपवडे ता. आजरा येथील सागर महादेव चव्हाण या ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह काल मंगळवार दिनांक ९ रोजी मसोली येथील चराटी यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये आढळून आला. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की वाहन चालक म्हणून काम करणारा सागर गेल्या दोन दिवसापासून हरपवडे येथील घराकडे परतला नव्हता. दरम्यान मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मसोली येथील चराटी यांच्या विहिरीमध्ये एक मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांना सदर बातमी समजतात स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असता तो सागर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पाय घसरून तो विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतची वर्दी मुकुंद निर्मळे, रा. पारेवाडी यांनी पोलिसात दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सागर याच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन मुली आहेत.

आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी भरत हातकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याच्या प्रशासन विभगामधील भरत हरीबा हातकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अंत्यसंस्कार बुधवार दिनांक दि.१० रोजी सकाळी ७.३० वाजता महागोंडवाडी येथे करण्यात येणार आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.