लोकसभेसाठी महायुतीला राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा.- विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. 👉राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश.
मुंबई :- प्रतिनिधी.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवाजी पार्कवर झालेल्या गुढी पाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. हा पाठिंबा बिनशर्त असून तो फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.
🛑या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले कि, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा आहे भारतातील तरुणांकडे लक्ष द्या. हे देशाचं भविष्य आहे. आता फक्त १० वर्ष आहेत. नंतर देश वयस्करांचा होईल, असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी मनसेची लोकसभा निवडणुकीबाबात भूमिका देखील स्पष्ट केली. एक गोष्ट स्पष्टच सांगतो, एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन.
🔴मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो. येणाऱ्या लोकसभा निवडणुका देशाच भविष्य ठरवणार आहेत. महाराष्ट्राला मोठा वाटा हवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मला अपेक्षा आहेत. मी फक्त मोदींसाठी पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट सांगितलं. मला वाटाघाटी नको. राज्यसभा नको, लोकसभा नको. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नी फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
🟥केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यान फक्त मी आणि ते होतो. भेट दुसऱ्या दिवशी होती मी आधल्या दिवशी गेलो होते. त्यानंतर मी बोललो नाही. कारण माझ्याकडे बोलायला काही नव्हतं. अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं योग्य वेळी सर्व मांडेन. शिंदेंच्या शिवसेनेचे अध्यक्ष होणार?, अशा चर्चा रंगल्या. मला व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो. पण मला पक्ष फोडून कुठलीही गोष्ट करायची नव्हती, स्वत:चा पक्ष काढीन पण कुणाच्या हाताखाली काम करणार नाही ही खूनगाठ मी बांधली होती, असे राज ठाकरे म्हणाले.
🟥जे योग्य ते योग्यच..
माझ्यावर अनेकजण टीका करतात की, 2019 च्या निवढणुकीत मी भाजपचा विरोध केला होता. पण, मी जे योग्य त्याला योग्य बोललो, जे अयोग्य त्याला अयोग्यच बोललो. 2014 च्या निवडणुकीनंतर मला वाटले की, मी जो विचार करत होतो, तसा पाच वर्षात काहीच झाला नाही. मी आजही सांगतो, ज्या गोष्टी पटल्या नाहीत, त्या नाहीच. ज्या चांगल्या वाटल्या, त्याला चांगलं बोलणार आणि ज्या चांगल्या वाटल्या नाही, त्याला विरोध करणार. मी जेवढे टोकाचे प्रेम करतो, तेवढाच टोकाचा विरोधही करतो. 🅾️होय 2019 साली मी टोकाचा विरोध केला. पण, पुढे कलम 370, सीएए, एनआरसीसारखे चांगले निर्णय सरकारने घेतले. गेल्या पाच वर्षात ज्या चांगल्या गोष्टी घडल्या, त्याचे मी पहिल्यांदा स्वागत केले आहे. ज्या गोष्ट योग्य, त्या योग्य अन् ज्या अयोग्य त्या अयोग्यच. आता माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एकच अपेक्षा आहे. आपला भारत देश संपूर्ण जगात सर्वात तरुण देश आहे. देशातील तरुणांमध्ये खुप काही करण्याची ताकद आहे. आजच्या तरुणांना चांगले शिक्षण, तंत्रज्ञान, नोकरींची गरज आहे. पुढील दहा वर्षात हा देश पुन्हा वयस्कर होईल. या देशातील तरुणांकडे लक्ष दया, एवढीच मी नरेंद्र मोदींकडे अपेक्षा ठेवतो, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.