HomeUncategorizedआजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त ४ कोटी ५१ लाखाच्या ठेवी जमा.

आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त ४ कोटी ५१ लाखाच्या ठेवी जमा.

आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त ४ कोटी ५१ लाखाच्या ठेवी जमा.

आजरा.- प्रतिनिधी.

दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ४ कोटी ५१ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांमध्ये बँकेला एकूण ढोबळ नफा १२ कोटी १८ लाख इतका झाला आहे. याबाबत बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले व सर्वांना बँकेच्या वतीने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.