HomeUncategorizedअहमदनगर मध्ये ईडीची सर्वात मोठी कारवाई ! 👉दुबईत राहणारे विनोद खुटे यांच्या...

अहमदनगर मध्ये ईडीची सर्वात मोठी कारवाई ! 👉दुबईत राहणारे विनोद खुटे यांच्या करोडोंच्या मालमत्ता केल्या जप्त.

🔴अहमदनगर मध्ये ईडीची सर्वात मोठी कारवाई ! 👉दुबईत राहणारे विनोद खुटे यांच्या करोडोंच्या मालमत्ता केल्या जप्त.

नगर :- प्रतिनिधी.

सक्तवसुली संचालनालयान अर्थात ईडी या तपास यंत्रणेचे नाव सर्वश्रुत आहे. सध्या अनेक नेत्यांची चौकशी ईडीमार्फत सुरु असते. दरम्यान आता या ईडीने अहमदनगर जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई केली आहे. मल्टी लेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून करोडोंची फसवणूक झाली असून साधारण ही गुंतवणूकदारांची फसवणूक सुमारे १२५ कोटींची असल्याची माहिती मिळाली आहे.

🟥मूळ नगर जिल्ह्यातील रहिवासी व सध्या दुबईत राहणारे विनोद खुटे याच्यावर ही कारवाई झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) व्हीआयपीस् ग्रुप-ग्लोबल अॅफिलिएट बिझनेसचे मालक विनोद खुटे यांच्या कुटुंबीयांशी संबंधित ८ कोटी ९८ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.यामध्ये पुण्यातील पाच सदनिका, दोन सभागृह, दोन कार्यालये, अहमदनगर येथील जमिनीचा समावेश आहे. याप्रकरणी आतापर्यंत ७० कोटी ८९ लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली असून, चौकशी सुरू आहे. पुण्यातील पाच सदनिका, दोन सभागृह, दोन कार्यालये व अहमदनगर येथील दोन हेक्टर जमीन यावर ईडीने टाच आणली आहे.

🅾️गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी विनोद तुकाराम खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडाधे आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🟥मुख्य आरोपी दुबईत वास्तव्याला असलेला विनोद खुटे असून, त्याने दुबईस्थित कंपनी मेसर्स काना कॅपिटल लिमिटेडच्या माध्यमातून बेकायदेशीर व्यापार, क्रिप्टो एक्स्चेंज नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे.

🔴जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये पुणे येथील ३६६.९२ स्क्वेअर मीटरचे पाच फ्लॅट्स असून १३९.३९ स्क्वेअर मीटरचे दोन मल्टीपर्पज हॉल, ३६६.९२ स्क्वेअर मीटरचे दोन ऑफिस यांचा समावेश असून नगर जिल्ह्यातील ८.९८ कोटींच्या २ हेक्टर जागाही समाविष्ट आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.