ती होती म्हणून आम्ही घडलो.- आम्ही सावित्रीबाईंच्या लेकी.- ( आजऱ्यातील सावित्रीबाई सेवाभावी संस्थेची स्थापना किल्ले सामानगडावरून.)
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
आजरा येथील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सावित्रीबाई सेवाभावी संस्थांच्या कार्याला सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सामानगडावरून स्वच्छता मोहीम हाती घेत कार्याची सुरुवात व बैठक दि. ७ रोजी किल्ले सामानगड भवानी मातेच्या मंदिरात संपन्न झाली.
सुरुवातीला मासाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपत महिला सबलीकरण व महिलांच्यासाठी रोजगार निर्मिती करत काम करण्याचे ध्येय, ध्यास, व उद्देश डोळ्यासमोर ठेवून किल्ले सामानगड वरून शिवरायांच्या साक्षीने हाती काम घेण्याचा निश्चय करत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री कांबळे होत्या. स्वागत व प्रस्ताविक उपाध्यक्ष नीता बोलके यांनी केले.
यावेळी संस्थेची ध्येय धोरणे या संस्थेच्या सद्यस्थितीत उपशाखा पाच असून लवकरच या शाखेचे उद्घाटन सोहळा लोकसभा निवडणुकीनंतर घेण्यात येणार आहे. तसेच संस्थेची नियम व अटी संस्थेच्या माध्यमातून कोण कोणती कामे हाती घ्यावी. याबाबतची चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष जयश्री कांबळे म्हणाल्या आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो आपण महिलांसाठी प्रत्येक गावातील पाच दहा महिला एकत्र येऊन वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या रोजगार निर्मिती करून महिलांच्या हाताला काम देऊया याबाबत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आपण कोणतेही काम हाती घेणार नाही. आचारसंहिता संपल्यानंतर आपण प्रत्येक गावात सावित्रीबाई सेवाभावी संस्थेची संस्था स्थापन करण्याचे काम हाती घेणार आहोत. यासाठी मुख्य शाखा सदस्य यांनी कामाला लागावे. आपल्या संस्थेची ध्येय धोरणे अन्य गावातील महिलांसमोर मांडून जास्तीत जास्त महिलांना सहभागी करून घ्यावे. असे सौ कांबळे यांनी आपल्या मनोवतात सांगितले. सर्व महिला सदस्यांनी संस्थेबद्दलची आपली भूमिका व आपले मत व्यक्त केले.
