निधन वार्ता
वैद्य पांडुरंग पोवार रा.सोहाळे
हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन.
आजरा.- प्रतिनिधी.
वैद्य पांडुरंग तुकाराम पोवार रा.सोहाळे ता.आजरा यांचे शनिवार दि.६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले, ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांति देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. अंत्ययात्रा आज रविवार रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लकवा, गुडघेदुखी, पाठ दुखी, अंगदुखीवर तसेच अन्य रोगावर आयुर्वेदिक औषधी देऊन काही दिवसातच रुग्णांना बरे करणारे हात गुणी म्हणून ते नावारूपाला आले होते. अनेक पेशंट त्यांनी चालते – बोलते केले आहेत. सद्या काही रुग्णांवर त्यांचा उपचार सुरू होते. असा एक हाडाचा आयुर्वेदिक वैद्यकीय म्हणून त्यांचं उत्कृष्ट काम होतं. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली व दोन मुले असा परिवार आहे.