आंबोली महामार्गावरील वाहतुकीस अडथळा होणारी वाहने हलवा.- आजरा पोलीस स्टेशनला.- आजरा अन्याय निवारण समितीचे निवेदन,
आजरा.- प्रतिनिधी.
राष्ट्रीय महामार्ग शंकेश्वर बांधा या महामार्गातील आंबोली रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होणारी वाहने हलवणेबाबत.अन्याय निवारण समितीचे निवेदन आजरा यांनी आजरा पोलीस स्टेशनचे सपोनि यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सद्या संकेश्वर-बांधा महामार्गाचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. बहुतांशी ठिकाणचे काम पूर्णही झाले आहे. मयुर पंप ते आजरा न्यायालय नवीन इमारतीपर्यंत मनमानी पध्दतीने अवजड वाहने, चार चाकी व दुचाकी वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जात आहेत. मुळातच महामार्गाचे काम सुरु असताना ही वाहने इतर वाहनांचे वाहतुकीच्यादृष्टीने अडथळा ठरत आहेत.
आपण तातडीने याकडे लक्ष देऊन या भागातील अवजड वाहने, चार चाकी व दुचाकी वाहते रस्त्यावर उभी करण्यास प्रतिबंध करावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर परशुराम बामणे अध्यक्ष, सुधीर कुंभार उपाध्यक्ष, पांडुरंग सावरतकर सेक्रेटरी, विजय घोरवत सचिव, गौरव देशपांडे सह सेक्रेटरी, राजु विभुते सहसचिव यांच्या सह्या आहेत.
