प्रज्ञाशोध परीक्षेत घाटकरवाडी शाळेचा विध्यार्थी आयुष जालंधर परीट आजरा तालुक्यात प्रथम. ( वेद प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात ५ वा क्रमांक.)
आजरा.- प्रतिनिधी.
जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे मार्फत घेणेत आलेल्या इयत्ता ४ थी प्रज्ञाशोध परीक्षेत वि. मं घाटकरवाडी शाळेचा विध्यार्थी आयुष जालंधर परीट हा आजरा तालुक्यात प्रथम तसेच वेद प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात ५ वा क्रमांक व ऋणानुबंध प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यस्तरीय गुणवंत यादीत आला व श्रीरंग सोनबा तांबेकर हा केंद्रस्तर गुणवंत यादीत आल्याबद्दल तसेच ऋणानुबंध टॅलेंट सर्च भुदरगड यांचे मार्फत घेणेत आलेल्या परीक्षेतील सर्व गुणवंत विध्यार्थी, यांचे. श्री महेंद्रनाथ कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ घाटकरवाडी, अध्यक्ष महेश पाटील, अविनाश अडकुरकर, विशाल पाटील, शुभम पाटील, हर्षद तांबेकर, सागर जनबा पाटील, अनिल अडकुरकर यांचे मार्फत सत्कार करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणारे शाळेचे कार्यशील मुख्याध्यापक कोंडूसकर सर व परीट सर यांचा ही सत्कार करण्यात आला .