भाग.१ – रणधुमाळी लोकसभेची – कोल्हापुरातून बाजी मारणार कोण.- जनतेच्या मनात छत्रपती शाहू महाराज.? खास. मंडलिक यांच्यावर नाराजीचा सूर का.?
कोल्हापूर.- प्रतिनिधी.
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळला सुरुवात होत आहे. एकीकडे सत्ताधारी व महायुतीचे विद्यमान खासदार संजय मंडलिक त्यांची उमेदवारी शिवसेना शिंदे गट यांच्याकडून निश्चित झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसची उमेदवारी छत्रपती शाहू महाराज यांची निश्चित होऊन प्रचाराला सुरुवात झाली आहे. श्री मंडलिक यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली व प्रत्यक्षात प्रचार सुरू होण्यापूर्वी नाराजीचा सूर भाजपच्या बैठकीत सुरू झाला. अर्थात प्रचाराचा शुभारंभ नाराजीवर. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खास. श्री मंडलिक फिरकलेच नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नाराईचा सूर मतदाराकडून व काही नेत्याकडून होणे चुकीचे नाही. लोकसभा निवडणुका पूर्वी एक महिना खास.श्री मंडलिक यांच्या फंडातील निधी काही प्रमाणात जिल्ह्यात रस्ते विकासातून देण्यात आला त्याच्या कामाची सुरुवात अगदी शेवटच्या टप्प्यात सुरू झाली त्या उद्घाटन कार्यक्रमाला देखील खास. श्री मंडलिक येऊ शकले नाहीत. आपले चिरंजीव यांच्यावरती जबाबदारी देऊन मतदारसंघाचा दौरा यशस्वी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे नक्कीच नाराजी दाखवणे हा हक्क मतदारांचा आहेच. आता प्रचार यंत्रणा व नाराजी यामधील मागील विधानसभा निवडणुकीत खास. श्री मंडलिक यांच्यामुळे काही उमेदवार अल्पमतात पराभूत झाले ते उमेदवार नेते आता या महायुतीत सोबत आहेतच. पण महायुतीचा व पक्षाचा आदेश म्हणून या लोकसभा निवडणुकीत खास. श्री मंडलिक यांच्यासोबत मनापासून काम करणार का? व केल्यास पुढील येणाऱ्या विधानसभेचा संभाव्य धोका पाहिल्यास पुन्हा नुकसान होण्याची भीती व खदखद मनामध्ये असणार आहे. यामुळे खास. श्री. मंडलिक बाजी मारणार की छत्रपती शाहू महाराज तसं सद्याचा कल पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी शाहू महाराजांना विजयी करण्याचा निश्चय केला असल्याचे सोशल मीडिया व चर्चा ऐकायला मिळते. कागल मधून समरजीत घाटगे, चंदगड मधून शिवाजी पाटील, यांच्या प्रराभावाला खासदार मंडलिक त्यावेळचा पक्ष आदेश व पक्षनिष्ठा यानुसार त्यांनी त्या – त्या उमेदवाराला मदत करणे साहजिकच बरोबर आहे. परंतु त्यावेळी ची शिवसेना भाजपची आघाडी असताना भाजपचे अपक्ष उमेदवार कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्व मतदारसंघात उभे राहून शिवसेनेचे सहा आमदार पाडले गेले. पण लोकशाहीच्या अधिकाऱ्याने प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. उमेदवारी करण्याचे यामध्ये भाजपचे रमेश रेडेकर व अशोक चराटी हे देखील उमेदवार रिंगणात होतेच. कोणाची ताकद किती यापेक्षा शिवाजीराव पाटील हे विजयापर्यंत पोहोचत असताना अल्पमतातच पराभव झाला. हा पराभव श्री पाटील विसरणार का.? किंवा कागल मधला पराभव समरजीत घाटगे विसरतील का? अशा अनेक वेगवेगळी कारणे आहेत. खास. श्री मंडलिक यांची कोल्हापुरात जाऊन भेट न होणे कार्यक्रमाला उपस्थित राहणे असा प्रचंड नारळीचा सूर मतदार संघात आहे. छत्रपती शाहू महाराज प्रथमच राजकीय क्षेत्रात व लोकसभेचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. ते कोल्हापूरचे राजे आहेत त्यांना विजयी करून लोकसभेत पाठवणे ही जनतेची जबाबदारी आहे. यामुळे आम्ही यावेळी फक्त शाहू महाराज या चर्चेला उधाण आले आहे. अजून लोकसभेची प्रचार धुमाळी सभा मेळावे बैठका याची सुरुवात होणार आहे. यामधील काही फेरबदल होऊ शकतात परंतु या प्रचार सभेतून मतदारांच्या मनात कितपत बिंबवता येईल सांगता येत नाही त्यातच महागाई व अनेक कारणामुळे मग यामध्ये, राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड त्यांच्यावरील कारवाई कार्यकर्ते व मुश्रीफ गट, महाराष्ट्रात पक्ष फोडणे, ईडी, राजकारण असेल जनता भाजपवर नाराजीचा सूर पुढे येत आहे. यामुळे कोणत्याही लाटेचा कोणताही या ठिकाणी संबंध येत नाही मुळात कोल्हापूरची जनता ही लाटेवर नसते तर जे काही मनात ठरवलं आहे तेच करते. मागील लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना पराभव करण्याचा निश्चय केला होता. श्री महाडिक यांनी मतदारसंघात प्रचंड काम केलं होतं नेटका जनसंपर्क होता. तरीही श्री मंडलिक यांचा विजय झाला होता तोही कोणत्या लाटेमुळे नाही तर कोल्हापूर जनतेने एकदा ठरवलं की त्या विषयावर ठाम असते. यामुळे निश्चितपणे शाहू महाराज या लोकसभेत आघाडी घेणार की पुन्हा संजय मंडलिक मतदारांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होणार हे प्रचाराच्या रणधुमाळी दरम्यान थोडेसे चित्र लक्षात येईल यासोबत अपक्ष उमेदवार चेतन नरके हे दोन वर्षापासून गावोगावी आपल्या उमेदवारीचे बॅनर शहरापासून खेडेगाव पर्यंत पोहोचले आहेत ते स्वतः पोहोचले नसले तरी त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून होती. होती तीही शिवसेना उभाठा गट मधून निश्चित मानले जात होते. पण हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने ऐनवेळी त्यांना हातकणंगले मतदारसंघ देण्याचे ठरले परंतु त्याला त्यांनी नकार दिला आता ते अपक्ष उमेदवार म्हणून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याचे समजते. या उमेदवारीचा फटका कोणाला बसतो यावरही अजून तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर कदाचित वंचित बहुजन आघाडी आपला कोल्हापूर मधून उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. यामुळे मतांची विभागणी निश्चित होणार आहे..
क्रमशः