कोकण पद्धतीचा आजरा.- किटवडेत सात दिवसाचा होळीचा सण होतो उत्साहात संपन्न. ( पारंपारिक सणांची आजही प्रथा..)
आजरा.- संभाजी जाधव.
आजरा तालुक्यातील किटवडे येथे होळीचा ७ दिवसांचा पारंपरिक सिमगा (होळी) सण साजरा केला जातो. या विभागात अन्य कोणतीही यात्रा, जत्रा नसते होळी व गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. होळी या सणाला सात दिवसात ग्रामस्थांच्या मध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण असते होळी सणाच्या सात दिवसात क्रमशः वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात त्यामध्ये पहील्या दिवशी होळी उभी केली जाते सर्व गावकरी चव्हाटा येथे एकत्र येऊन होळी उभी करतात त्यानंतर सर्व जण प्रथेप्रमाणे गान्हाने सांगतात नंतर होळीच्या कडेने गवत गोल रिंगन करून टाकले जाते व ढोलाच्या गजरात ते पेटवून लहान मुले बोंब मारत गोल फिरतात व नंतर सर्व ग्रामस्थ पुरण पोळीचा नैवेद्य घेउन येतात सर्वांचे नैवद्य आल्यावर एकत्र देवाला दाखविला जातो त्यातील प्रत्येकाच्या कांही पोळया घेऊन होळीला बांधतात व दुसऱ्या दिवशी धुलवड झाल्या नंतर प्रसाद म्हणून वाटतात दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन सर्वजण मंडप घालतात व दुपार नंतर हुड्दी म्हणजेच कबडी स्वरूपात धुलवड खेळली जाते त्यानंतर मोठे गोल .दगड (गुंड्या ) उचलण्याची स्पर्धा असते ती झाल्यावर सर्वजण प्रत्येक घरी जाऊन उंडे घेतात . पायामध्ये चप्पल न घालता सर्व गावभर फिरावे लागते चव्हाटयाच्या परिसरात ७ दिवस चप्पल घालून कोणी येत नाही कोणी चुकुन घातले तर नारळ घेतला जातो. या सात दिवसात कांही लोक मंडपात बसुन असतात व रात्री झोपायला ही येतात रोज रात्री होळी जवळ जत म्हटले जातात सहाव्या दिवशी जागर असतो त्या दिवशी नाटक असतो राधाकृष्ण व रोंबट कार्यक्रम असतो सातव्या दिवशी सकाळी प्रत्येक घरी खेळे येऊन निरोपाचे जत म्हणतात त्यांची पुजा करून नारळ दिला जातो . दुपार नंतर पारंपरिक नृत्यात रंगपचमी खेळली जाते नवसाची गा -हाणी घातली जातात . त्यानंतर नारळ फोडून प्रसाद वाटला जातो रात्री घुगऱ्या मागीतल्या जातात व सनाची समाप्ती होते.