HomeUncategorizedछगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ.- महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची उद्यापासून पुन्हा सुनावणी

छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ.- महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची उद्यापासून पुन्हा सुनावणी

छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ.- महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची उद्यापासून पुन्हा सुनावणी

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.

शिदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून पुन्हा सुनावणी होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
🟥महाराष्ट्र सदन बांधकामातील 850 कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने 2016मध्ये छगन भुजबळ, पंकज भुजबळ व समीर भुजबळ यांच्यासह एकूण 52 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 2021 मध्ये सबळ पुरावे नसल्याचे सांगत छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली. छगन भुजबळ, मुलगा पंकज, पुतण्या समीरसह पाच जणांना न्यायालयाने दोषमुक्त केलेले. यानंतर अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती.
🔴गेल्या दीड वर्षांपासून भुजबळ यांच्या विरोधातील याचिकेला तारिख मिळत नव्हती. त्यामुळे अंजली दमानिया यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली. अखेर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उद्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी उभे केले जाणार आहे.

🛑महाराष्ट्र सदन घोटाळा.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना डिसचार्ज करण्यात आल होतं. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दिड वर्ष ऐकले जात नव्हते. ५ न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते.
🟥अंजली दमानिया यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. ”महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना निर्दोष सोडण्यात आलं होतं. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दिड वर्ष ऐकले जात नव्हते. 5 न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयासमोर एक SLP करून त्यावर ओरडी घेऊन, माननीय CJ यांना योग्य न्यायाधीशांसमोर त्याची लिस्टिंग करण्यासाठी विनंती करण्याचे आदेश मिळाले. शेवटी प्रकरण उद्या अनुक्रमांक 12 वर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर ठेवण्यात आले आहे.” असं ट्विट अंजली दमानिया यांनी केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.