HomeUncategorizedवन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना काडतुस घेऊन फिरत असताना मौ. नागवे. चंदगड येथील...

वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना काडतुस घेऊन फिरत असताना मौ. नागवे. चंदगड येथील आरोपीस चंदगड वन विभागाने घेतले ताब्यात.

वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना काडतुस घेऊन फिरत असताना मौ. नागवे. चंदगड येथील आरोपीस चंदगड वन विभागाने घेतले ताब्यात.

चंदगड.- प्रतिनिधी.

वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना काडतुस घेऊन फिरत असताना मौ. नागवे. चंदगड येथील आरोपीस चंदगड वन विभागाने घेतले ताब्यात घेतले आहे. यातील हकीकत
दि. २९/३/२०२४रोजी रात्रौ वनपरीमंडळ चंदगड कडील के.एस. डेळेकर वनपाल चंदगड, आकाश मानवतकर वनरक्षक उमगाव, सागर कोळी वनरक्षक चंदगड, गुंडू देवळी वनसेवक उमगाव व वन्यजीव बचाव पथक मौ. नागवे ज.क.क्र. २६/बी मध्ये रात्र गस्त घालत असताना जंगला लगतचे मालकी क्षेत्रात संशयास्पद बैटरीची हालचाल दिसून आली. तात्काळ स्टाफ समवेत बॅटरीच्या उजेडाचे दिशेने सदर मालकी क्षेत्राची तपासणी केली असता गोपाळ धोंडिबा गुरव, वय ७०, रा. नागवे, ता. चंदगड हे परवाना नसलेली सिंगल बोअर (बॅरल) काडतूस बंदूक व त्यामध्ये जिवंत काडतूस घालून खांद्याला लावून कपाळावर बैटरी लावून वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना मौ. नागवे मा.ग.नं. २५५ या ठिकाणी मिळून आले. त्यांना मुद्देमाल सह ताब्यात घेऊन योग्य ती कागद‌पत्र तयार करुन वरील मुद्देमाल जप्त करुन ताबेत घेऊन सदर गट नंबर मधील आरोपीचे राहते घर परिसराची तपासणी केली असता घर परिसरालगत मृत वन्यप्राणी भेकर चा चामड्याचा अर्धवट केसाळ तुकडा मिळून आला. सदरचा चामड्याचा तुकडा जप्त करून ताब्यात घेऊन आरोपी गोपाळ धोंडिबा गुरव यांचे विरुद्ध वनपाल चंदगड यांनी आपलेकडील प्र.गु.री.नं ०१/२०२४ दि. ३०/३/२०२४ रोजीचा नोंद केला असून पुढील तपास नंदकुमार भोसले (वनक्षेत्रपालं चंदगड) हे करत असून सदरची कारवाई जी गुरुप्रसाद (उपवनसंरक्षक कोल्हापूर), नवनाथ कांबळे सो (सहा. वनसंरक्षक कोल्हापूर ) यांचे मार्गदर्शनखाली श्री. नंदकुमार भोसले (वनक्षेत्रपालं चंदगड), के.एस. डेळेकर वनपाल चंदगड, श्रीमती वर्षदा पावसकर वनपाल मिरवेल, श्री. आकाश मानवतकर वनरक्षक उमगाव, सागर कोळी वनरक्षक चंदगड, श्रीमती सादीया तांबोळी वनरक्षक सुलीये, गुंडू देवळी वनसेवक व वन्यजीव बचाव पथक मधील सर्व सदस्य यांनी संयुक्त पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.