HomeUncategorizedभाग.१ - "बम - बम - भोले"..- आजरा तालुक्यात तरुणांची आत्महत्या कशासाठी.-...

भाग.१ – “बम – बम – भोले”..- आजरा तालुक्यात तरुणांची आत्महत्या कशासाठी.- सोशल मीडियासह अनेक कारणे असू शकतात. – एक नजर

भाग. १
बम – बम – भोले..- आजरा तालुक्यात तरुणांची आत्महत्या कशासाठी.- सोशल मीडियासह अनेक कारणे असू शकतात. – एक नजर

संपादकीय.- संभाजी जाधव.

मागील एक महिन्यापासून आजरा तालुक्यात आत्महत्याच्या घटनेत वाढ होत चालली आहे. ते सत्र आज ३० मार्च २०२४ रोजीही सुरूच आहेच. मुळात आत्महत्या करणे ही कमजोरीची लक्षणे असली तरी आत्महत्येचा मनात विचार येणे व तो का? येतो याची कारणे शोधली पाहिजे. या आत्महत्याला जबाबदार अनेक कारणे आहेत. किंवा असू शकतात यामध्ये प्रामुख्याने सोशल मीडिया, ऑनलाइन मिळणारी कर्ज, व्यसनाच्या आहारी जाणं, कर्जबाजारी, शिक्षण असून नोकरी नसणे, लग्न न होणं, वाढत्या महागाईमुळे व आर्थिक उत्पन्नाचा साधन नसल्याने कुटुंब सांभाळताना अडचणीचा सामना करावा लागणं. यामध्ये आजरा सारख्या ग्रामीण भागात नशेली पदार्थ सेवन करण्यास उपलब्ध होत असल्याचे समजते .”बभ – बभ भोलेच्या” गजरात नसेली पदार्थांचे सेवन करून एकांतात अड्डे चालू असल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये आजची काही तरुन पिढी भरकटली जात आहे. अशा नसेली पदार्थ कुठून येतात त्याची विक्री करणारे टोळी, सेवन करण्याचे कुठे अड्डे आहेत. यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील तरुण वर्ग भरकटला जात आता याचा शोध घेणे ही जबाबदारी कोणाची आहे. यावर चर्चा होत असते. पण प्रत्यक्षात यातून मार्ग काढण्यासाठी तालुक्यातील आत्महत्या का.? होत आहेत. यासाठी सामाजिक राजकीय तसेच तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक यांच्या मार्गदर्शनाखाली काही शास्त्रीय, दैविक कारणे लागलीच शोधणे व याबाबत प्राथमिक, हायस्कूल, कॉलेज या ठिकाणी विद्यार्थ्यांची आत्महत्या कशासाठी याबाबत व्याख्यानात्मक कार्यक्रम आयोजन करून तरुण पिढीचे विचार बदलणे याबाबत तालुक्यातील तरुण पिढीला कोणती समस्या असल्यास हेल्पलाइन निर्माण करून देणे गरजेचे आहे. आपली समस्या सांगा ती गुप्त ठेवण्यात येईल व त्यातून मार्ग काढण्यात येईल असा काही असो मार्ग शोधणे हाच पर्याय आहे. तर दुसरीकडे तरुण पिढी आत्महत्या करण्याचे विचार येत असताना आपल्या आई-वडिलांचा किंवा बहिण भाऊ नातलगांचा व आपल्याला लहानाची मोठी केल त्या आई-वडिलांनी कावड कष्ट करून शिक्षण दिले याचा विचार न करता आत्महत्या करण्याचे धाडस करतात अशा विचारांना प्रवृत्त होऊ नये यासाठी एक पाय पुढे येऊन तालुक्यातील राजकीय सामाजिक नेत्यांनी पुढे येऊन बदल घडू शकतो. या आत्महत्या थांबतील का ? याकडे एक नजर देणे आजची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.