आजरा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी.- खून करून प्रेत जाळणाऱ्या आरोपींच्या हातात घातल्या बेड्या.
( आजरा तालुक्यातील सुळे येथील एक साथीदार आरोपी )
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी केली आहे. खून करून प्रेत जाळणाऱ्या आरोपींच्या हातात घातल्या बेड्या घातल्या आहेत. यामध्ये
आजरा तालुक्यातील सुळे येथील एक साथीदार आरोपी आहे.
रात्रगस्त पेट्रोलींग करीत असताना गुन्हेगार लागले हाती.
यामधील निष्पन आरोपीचे नाव व पत्ता
१) सुनिता सुभाष देवकाई व.व. 44 रा. वैभव गार्डन रूम नं. 6 विठ्ठल मंदीर शेजारी खोपोली ता. खालापूर जि. रायगड 2) अमित पोटे रा. सुळे ता. आजरा, 3) सुरज सुभाष देवकाई रा. वैभव गार्डन रूम नं. 6 विठ्ठल मंदीर शेजारी खोपोली ता. खालापूरजि. रायगड
गुन्हयाची हकीगत अशी की लोकसभा निवडणुक अनुशंगाने आजरा पोलीस ठाणे हद्दित बहिरेवाडी येथे आंतरराज्य चेक पोस्ट असून तेथे वाहनाची तपासणी केली जाते. दिनांक 28/03/2024 रोजी रात्रीच्या सुमारास आजरा पोलीस ठाणे अंतर्गत बहिरेवाडी येथे असलेल्या आंतरराज्य चेक पोस्ट वरून एक पांढ-या रंगाची चार चाकी गाडी भरधाव वेगाने उत्तूर आजरा रस्त्याने पुढे न थांबता निघून गेली. त्यावेळी चेक पोष्ट वरील हजर पोलीस अंमलदार यांना सदर वाहनाचा संशय आलेने त्यांनी रात्रगस्तीवरील अंमलदार तसेच प्रभारी अधिकारी यांना सदरची माहिती दिल्याने रात्रगस्त अंमलदार तसेच चेक पोस्ट वरील अंमलदार प्रभारी अधिकारी व पोलीस स्टाप असे

सदर वाहनाचा शोध घेत असताना बहिरेवाडी ते मुम्मेवाडी पाटामध्ये एक इसम चार चाकीवाहनासह थांबलेला दिसला त्याच्याकडे पोलीस पथकाने विचारपुस केली असता त्याने त्याची पत्नी बाजुस असलेल्या झुडपामध्ये टॉयलेटला गेली आहे असे सांगितले असता पोलीस पथकातील महिला अंमलदार यांनी झुडपाकडे जावून पाहिले असता तेथे एक महिला मिळुन आली तिचे समोर निळ्या रंगाची ट्रॅव्हलर बैंग चार प्लॅस्टीकच्या पेट्रोलच्या बॉटल व हरभरा कोंढा दिसला त्याबाबत तिच्याकडे विचारपुस करीत असताना तिच्या सोबतचा इसम चारचाकी वाहनासह तेथून निघून गेला त्यावेळी सदर महिलेस अधिक विश्वासात घेवून तिचे कडे चौकशी केली असता तिने सदर वेंगमध्ये गजेंद्र सुभाष वांडे व.व.38 रा. 1233 खैरी प्लॉट जिंतूर जि. परभणी याचे प्रेत असून तिचे व गजेंद्रचे 2 वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. गजेंद्र याने आरोपी नं. 1 सुनिता सुभाष देवकाई व.व.44 रा. खोपोली ता. खालापूर जि. रायगड हिचे सोवत लग्न करतो असे सांगितले होते. त्याने तिच्याशी लग्न केले नाही तिच्याकडून वेळचोवेळी पैसे घेतले ते पैसे तिने परत मागितले असता तिला परत दिले नाही. त्या रागापोटी दिनांक 27/3/2024 रोजी गजेंद्र यास श्री. हरळीकर रा. खोपोली ता. खालापूर जि. रायगड याचे रुमवर तिने त्यास झोपेच्या गोळया देवून तो झोपी गेलेनंतर रात्री 11-30 वाजता तिचे ओळखीचा अमित पोटे रा. सुळे ता. आजरा यांस बोलावून घेवून त्या दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून त्याला ठार मारले त्यानंतर दुस-या दिवशी सकाळी तीने बाजारात जावून एक मोठी ट्रॅव्हलर बैंग घेवून येवून आरोपी नं.2 अमित पोटे रा. सुळे ता. आजरा व आरोपी नंबर 3 मुलगा सुरज यांच्या मदतीने गजेंद्र बांडे याचे हात पाय बांधून त्यांस ट्रॅव्हलर बॅग मध्ये घातले व त्याची चेन ओढून बंद केले. त्यानंतर अमित पोटे याने गाडी भाडयाने बोलवून घेतली त्या गाडीमध्ये ट्रॅव्हलर बैंग ठेवून सुनिता देवकाई व अमित पोटे, ड्रायव्हर असे खोपोली येथून निघून. कोल्हापूरचे पुढे कागल गावी रात्री येवून ड्रायव्हर यांस लॉजवर थांबवून कागल येथून निघून रत्यामध्ये असले पेट्रोल पंपावर चार बॉटल पेट्रोल घेवून त्या दोघांनी गजेंद्रचे प्रेत निर्जन स्थळी नेवून जाळून टाकायचे असे ठरवून थोडे अंतर पुढे आलेनंतर रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून शेतामधील हरभराचा कोंढा बेडशीट मध्ये बांधून घेतला त्यानंतर निप्पाणी आजरा रोडने पुढे येवून बहिरेवाडी मुम्मेवाडी घाटात नेवून यातील मयत यांस जाळणार होते अशी कबुली दिल्याने तिला ताब्यात घेण्यात आले तसेच चारचाकी वाहनासह निघून गेलेला आरोपी क्रमांक 2 याचा शोध सुरु आहे. यातील आरोपी नं. 1 ते 3 याचे विरुध्द वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
