🛑 ईडी खंडणीचे रॅकेट चालवतेय!. – अरविंद केजरीवालांचा भर न्यायालयात हल्ला.- अरविंद केजरीवाल. 👉मग मी असं म्हटलं की मोदी आणि अमित शहा यांना मी 100 कोटी रुपये दिले तर तुम्ही माझ्या जबाबाच्या आधारावर मोदी-शहांना अटक करणार का ?
🛑कोर्टात शांतता पसरली.
नवी दिल्ली वृत्तसंस्था.
दुसऱ्याच्या जबाबावरून मलाअटक केली मग माझ्या जबाबरून मोदी आणि शहाणा अटक करणार का ? कोणत्याही कोर्टाने दोषी ठरवले नाही तरी ‘ईडी’ने अटक केली. या अटकेमागे मोठे राजकीय षडयंत्र असून, ईडीचे दोनच मिशन आहेत. एक आम आदमी पक्षाला चिरडणे आणि दुसरे ‘स्मोकस्क्रीन’ तयार करून खंडणी गोळा करणे. ईडीच खंडणीचे रॅकेट चालवतेय, पैसा गोळा करत आहे, असा थेट हल्लाबोल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भर न्यायालयात केला. यामुळे ईडीचा खरा चेहराच पुन्हा जनतेसमोर आला आहे. दरम्यान, केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यास स्पष्ट नकार देताना न्यायालयाने यासंबंधीची याचिका फेटाळून लावली आहे.
🟥दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री यांना ईडीने अटक केली आहे. त्यांना कोठडी गुरुवारी ईडीने रौस न्यायालयात हजर केले. यावेळी केजरीवाल यांनी स्वतःच बाजू मांडली. न्यायाधीशांनी तुम्ही लेखी म्हणणे द्या, असे सांगितले. त्यावर मला थोडा वेळ बोलू द्या, अशी विनंती केजरीवाल यांनी केली. न्यायाधीशांच्या परवानगीनंतर केजरीवाल यांनी ईडीवर अत्यंत गंभीर आरोप केले.
🛑36 हजार पानी आरोपपत्रात फक्त चार वेळा नाव
मद्य धोरणाचा तपास करणाऱया सीबीआयने 31 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. ईडीने 25 हजार पानी आरोपपत्र दाखल केले. एकूण तब्बल 36 हजार पानी आरोपपत्रात केवळ चार वेळा माझे नाव आहे. तीन ठिकाणी अरविंद केजरीवाल तर एका ठिकाणी सी. अरविंद असा उल्लेख आहे, याकडे केजरीवाल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. सी. अरविंद हे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे सचिव होते. माझ्याकडे आमदार फाईली घेऊन घरी भेटायला येतात. सरकारी कामांसाठी येतात. एवढय़ा कारणावरून मुख्यमंत्र्यांना अटक करणार का? असा सवालही त्यांनी केला.तसेच ईडी आणि सीबीआयचे हजारो पानांचे आरोपपत्र न्यायालयाने एकत्र वाचले तरी मला का अटक केली? असा प्रश्न न्यायालयालाही पडेल, असेही केजरीवाल म्हणाले.
🅾️न्यायालयाने सुनावली अरविंद केजरीवाल यांना सोमवार दि.1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी
ईडीने केजरीवाल यांना 21 मार्चला अटक केली. त्यानंतर न्यायालयाने 28 मार्चपर्यंत कोठडी दिली होती. आज त्यात आणखी चार दिवसांची वाढ केली आहे. न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. 1 एप्रिलपर्यंत) अरविंद केजरीवाल यांना ईडी कोठडी सुनावली.
🛑सारत रेड्डीने भाजपला 55 कोटी रुपये दिले
माझ्याविरुद्ध साक्ष देणारा हैदराबादचा उद्योगपती सारत रेड्डीने भाजपला 55 कोटी रुपयांची देणगी दिली. निवडणूक रोखे दिले. विशेष म्हणजे ईडीने अटक केल्यानंतर रेड्डीने 55 कोटींमधील 50 कोटी रुपयांची देणगी भाजपला दिली. रेड्डीने जमीन विकत घेतली याचे पुरावेच माझ्याकडे आहेत, अशी धक्कादायक माहिती केजरीवाल यांनी न्यायालयात दिली.
🛑ईडीच्या स्मोकस्क्रीनच्या आडून भाजप खंडणी रॅकेट चालवतेय
भर न्यायालयात अरविंद केजरीवाल यांनी भाजपवरही गंभीर आरोप केले. विरोधकांना टार्गेट करण्यासाठी भाजपकडून ईडीचा वापर होतोय या आरोपांचा हवाला देत केजरीवाल यांनी निशाणा साधला. ईडीकडून स्मोकस्क्रीन तयार करून त्याच्या आडून भाजप खंडणी रॅकेट चालवतेय. पैसे गोळा करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
🔴ईडीचे दोनच मिशन
ईडीचा आरोप आहे की मद्य घोटाळ्यात 100 कोटींची लाच दिली होती. पण हे पैसे कुठे आहेत? ईडीला एकही पैसा मिळाला नाही, असे निदर्शनास आणतानाच केजरीवाल यांनी ईडीवर हल्लाबोल केला. एकाही कोर्टाने मला दोषी ठरवले नाही, तरी अटक केली गेली. यामागे राजकीय षडयंत्र आहे. ईडीचे दोनच मिशन आहेत. एक ‘आप’ला चिरडून टाकणे आणि दुसरे खंडणी रॅकेट चालवणे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.