आजऱ्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न शाहू महाराजांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्णय.
आजरा.- प्रतिनिधी.
देशातील संविधान वाचवण्यासाठी मोदी हटाव देश बचाव हा नारा देत महाविकास आघाडीची आजऱ्यात बैठक संपन्न झाली. अध्यक्षस्थानी मुकुंदराव देसाई होते. आजरा तालुक्यातील महाविकास आघाडी व मित्र पक्षांनी तालुक्यातील प्रचार यंत्रणा येणाऱ्या दोन दिवसात राबवण्यात येणार या पार्श्वभूमीवर बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. देशातील महागाईचा भस्मासुर व संविधान धोक्यात असून हुकूमशाहीच्या बळावर सध्या महाराष्ट्रात सह देशात राजकारण चालू आहे या भ्रष्ट प्रवृत्तीला काढून टाकण्यासाठी कोल्हापूरमधून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना विजयी करण्याचे शपथ या बैठकीत घेण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक विभागातील प्रचार यंत्रणेचे नियोजन याप्रसंगी करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील पक्ष व मित्र पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी यांची मनोगत व्यक्त केली यामध्ये मुकुंदराव देसाई, उमेश आपटे, संजय सावंत, उदयराज पवार, प्रभाकर कोरवी, युवराज पोवार, संपत देसाई, रविंद्र भांटले, राजेंद्र सावंत शांताराम पाटील, प्रकाश मोस्कसकर दयानंद भोपळे, रणजीत देसाई, अभिषेक शिंपी, संकेत सावंत, तसेच शरद पवार गट, उबाठा गट, क्राॅग्रेस व मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारांनी महाविकास आघाडीलाच का ?मतदान करावे याबाबत जनजागृती करण्यात येणार याबाबत गावागावात मतदारांनी या प्रचार मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले.