HomeUncategorizedभाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर🛑मोदी - शाहांसह गडकरी आणि फडणवीस करणार...

भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर🛑मोदी – शाहांसह गडकरी आणि फडणवीस करणार प्रचार.🟥कदाचित पुन्हा मतदानाचा अधिकारच मिळणार नाही!भाजपाला हटवा!!🟥सत्यपाल मलिक यांचा मोदींवर पुन्हा हल्ला!!!🟥मुंबईत धावत्या लोकलमधून पडून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू🛑रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत विरुद्ध भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यात रंगणार सामना..👇👇👇

🟥भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर
🛑मोदी – शाहांसह गडकरी आणि फडणवीस करणार प्रचार.
🟥कदाचित पुन्हा मतदानाचा अधिकारच मिळणार नाही!
भाजपाला हटवा!!
🟥सत्यपाल मलिक यांचा मोदींवर पुन्हा हल्ला!!!
🟥मुंबईत धावत्या लोकलमधून पडून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
🛑रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत विरुद्ध भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यात रंगणार सामना..👇👇👇

नवी दिल्ली:- वृत्तसंस्था.

भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. मध्यप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपच्या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
🅾️केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार राज्याच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आल आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनाही मध्य प्रदेशसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आलं आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती ईराणी आणि मनोज तिवारी यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.

🟥भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोण कोण?

१) नरेंद्र मोदी
२) जे.पी. नड्डा
३) राजनाथ सिंह
४) अमित शाह
५) नितीन गडकरी
६) योगी आदित्यनाथ
७) प्रमोद सावंत
८) भुपेंद्र पटेल
९) विष्णू देव साई
१०) डॉ. मोहन यादव
११) भजनलाल शर्मा
१२) रामदास आठवले
१३) नारायण राणे
१४) अनुराग ठाकूर
१५) ज्योतिरादित्य सिंधिया
१६) स्मृती इराणी
१७) शिवराज चौहान
१८) के. अण्णमलई
१९) रवि किशन
२०) मनोज तिवारी

🔴महाराष्ट्रातले भाजपचे स्टार प्रचारक कोण?

१) देवेंद्र फडणवीस २) एकनाथ शिंदे ३) अजित पवार ४) रावसाहेब दानवे ५) सम्राट चौधरी
६) अशोक चव्हाण
७) विनोद तावडे
८) पंकजा मुंडे
९) चंद्रशेखर बावनकुळे
१०) आशिष शेलार
११) सुधीर मुनगंटीवार
१२) राधाकृष्ण विखे पाटील
१३) पियूष गोयल
१४) गिरीश महाजन
१५) विजयकुमार गावित
१६) अतुल सावे
१७) धनंजय महाडीक
१८) अमर साबळे
१९) रविंद्र चव्हाण
२०) चंद्रकांत पाटील

🟥कदाचित पुन्हा मतदानाचा अधिकारच मिळणार नाही!
भाजपाला हटवा!!
🟥सत्यपाल मलिक यांचा मोदींवर पुन्हा हल्ला!!!

नवी दिल्ली – वृत्तसंस्था.

गेल्या अनेक वर्षापासून नरेंद्र मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडणारे सत्यपाल मलिक यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी देशवासींना आवाहन केले आहे की, मोदीची सत्ता उलथवून टाका.
🔴त्यांनी एक्सवर लिहिले की, जर मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर तुमच्या मुलांचे भविष्य अंधकारमय होईल. इतकेच नाही तर जर यावेळी संधी घालवली तर तुम्हाला परत कधी मतदानाचा अधिकारही मिळणार नाही. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी लिहिले की, एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकतो की, जर २०२४ मध्ये मोदी पुन्हा सत्तेवर आले तर येणाऱ्या काळात तुमच्या मुलांचे भविष्य अंधकारमय होईल.
सत्यपाल मलिक यांनी लिहिले की, सर्व देशवासीयांना माझे आवाहन आहे की, यावेळी निवडणुकीत तुम्ही सर्वांनी जात- धर्म न पाहता भाजपला हरवण्यासाठी मतदान करा. सत्तेत बसलेले लोक देशाला आतून पोखरत आहेत. काही भांडवलदारांसाठी देश लुटला जात आहे. तरुण बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. सरकारी रुग्णालये व सरकारी शाळा बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर तुम्ही आपल्या मुलांचे भविष्य उज्जल करणार असाल. महागाईपासून सुटकारा पाहिजे असेल, देशाला वाचवणार असाल तर मोदी सरकारला सत्तेतून उलथवून टाका.
सत्यपाल मलिक यांनी पुढे लिहिले की, जर यावेळी तुम्ही संधी घालवली तर पुन्हा तुम्हाला कधी मतदान करण्याचा अधिकार मिळणार नाही. याआधी सत्यपाल मलिकने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा विरोध करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांनी म्हटले की, मी आधीच सांगितले होते की, निवडणुकीच्या आधी अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाईल. सत्यपाल मलिक यांनी केजरीवाल यांच्या अटकेसाठी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यांनी लिहिले होते की, सत्तेवर बसलेला हुकूमशहा डरपोक माणूस आहे. जो देशाच्या सरकारी एजन्सीचा गैरवापर करत आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करत मोदी सरकारने आपल्या शवपेटीवर अखेरचा खिळा ठोकला आहे.

🟥मुंबईत धावत्या लोकलमधून पडून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबई:- प्रतिनिधी.

प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून पडून एका २५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना कोपर रेल्वे स्थानकाजवळ घडली. रोहित रमेश किळजे (वय २५) असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. या दुर्देवी घटनेमुळे पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे.
🟥मिळालेल्या माहितीनुसार, मृत रोहित किळजे डोंबिवली पश्चिमेकडील मथुरा अपार्टमेंट परिसरात आपल्या कुटुंबियासोबत राहत होते. मुंबईतील ताडदेव येथील पोलीस मुख्यालयात त्याची ड्युटी होती. वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर रोहित २०१८ मध्ये पोलीस खात्यात त्यांच्या जागी नोकरीला लागले होते.
🔴ताडदेव येथे मुख्यालयात ड्युटी असल्याने रोहित दररोज डोंबिवली ते दादर असा लोकल ट्रेनने प्रवास करीत असत. बुधवारी रोहित नियमितपणे सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांनी ड्युटीला जाण्यासाठी निघाले. त्यांनी डोंबिवली येथून दादरकडे निघालेली जलद लोकल ट्रेन पकडली.
🟥ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने रोहित दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करीत होते. कोपर रेल्वेस्थानकाजवळ ट्रेन आली असता, रोहित यांचा अचानक हात सुटला आणि ते धावत्या लोकलमधून खाली पडले. दरम्यान, प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या रोहित यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. वडिलानंतर रोहित घरातील कर्ता व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने आई आणि बहिणीचा आधार हिरावला गेला आहे. त्याचा मृतदेह चिपळूण येथील राहत्या घरी अंतिम विधीसाठी नेण्यात आला आहे.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत विरुद्ध भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यात रंगणार सामना..

🔴रत्नागिरी – सिंधुदुर्गची लोकसभेची जागा अखेर भाजपच्या पारड्यात पडल्याने आता या जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढविणार…

🛑भाजप विरुद्ध ठाकरे गट सामना रंगणार.- नारायण राणे यांच्या नावाची आजचं उमेदवारीची होणार घोषणासूत्रांची माहीती. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेची जागा शिंदे गटाला मिळावी यासाठी उद्योगमंत्री उदय सामंतसह शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक होते.तर या जागेवर उदय सामंत यांचे भाऊ किरण उर्फ भैय्या सामंत हे इच्छुक होते.
🟥तर हि जागा भाजपलाच मिळावी यासाठी भाजपचे प्रमोद जठार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती.अखेर आता ही रत्नागिरी – सिंधुदुर्गची लोकसभेची जागा भाजपच्याच पारड्यात पडल्याने शिंदे गटात नाराजीचा सुर उमटत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.