HomeUncategorizedकसाबला पकडणाऱ्या IPS सदानंद दाते यांच्याकडे NIA ची धुरा.- लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र...

कसाबला पकडणाऱ्या IPS सदानंद दाते यांच्याकडे NIA ची धुरा.- लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय.

🛑 कसाबला पकडणाऱ्या IPS सदानंद दाते यांच्याकडे NIA ची धुरा.- लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय.

मुंबई :- प्रतिनिधी.

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने NIA च्या महासंचालकपदी IPS सदानंद दाते यांची नियुक्ती केली आहे. ते 1990 च्या कॅडरमधील आहेत. 26/ 11 च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी कसाबला पकडण्याची कामगिरी दाते यांनी केली आहे. त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
देशातील आणि देशाबाहेरील दहशतवादाची पाळेमुळे नष्ट करण्याच्या NIA च्या कार्याला अधिक गती येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई हल्ल्याच्या वेळी प्रसंगावधान आणि बाहादुरी दाखवत दाते यांनी ओलिसांची सुटका केली आणि कसाबला जिंवत पकडण्यात यश मिळवले. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानिक करण्यात आले आहे.
🟥मुंबई हल्ला ही आपली कारकिर्दीतील आव्हानात्मक कामगिरी होती. या घटनेत आपल्यापरीने सर्वोकृष्ट कामगिरी करण्यासाठी आपण प्रयत्न केले, असे दाते म्हणाले होते. याआधी दाते यांनी सीआरपीएफ, आईबी, एटीएसमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत. तसेच मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.