देहू – नंतर आजरा तालुक्यातील पेरणोली येथे तुकाराम बीजसोहळा होतो. उत्साहात संपन्न..- उद्या तुकाराम बीजची जय्यत तयारी..
आजरा.- प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्ह्यातील व आजरा तालुक्यातील पेरणोली गाव हे चौहु बाजूंनी वसलेलं सुंदर गाव आहे. गावच्या चारी बाजूला शिवार आहे. ऊस ,भात,नाचणी पिकाची येथे समृद्धी आहे. तालूक्यात सधन गाव म्हणून ओळखले जाते. याच गावात देहू गावानंतर तुकाराम मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. गावाला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय परंपरा आहे. तुकाराम बीज आणि कुरकुंदेश्वर यात्रा हे गावच्या सांस्कृतिक सौंदर्याचे प्रतिक आहे.गोवा आणि महाराष्ट्र यांना जोडणारे शेवटचे रवळनाथ मंदीर आहे.तशी पेरणोली आणि कुरकुंदे अशी महसुले असलेली दोन गावे आहेत.परंतु प्लेगच्या साथीमूळे कुरकुंदे गावातील कुटुंबं पेरणोली गावात रहायला आली व पेरणोलीतच स्थायिक झाली. पूर्वी आजरा हे इचलकरंजीचे संस्थान असल्यामूळे पेरणोलीचे महसूल कार्यालय भुदरगड तालूक्यात होते.त्यावेळी लोक भुदरगडला चालत जात होते. इंग्रजाविरूद्धच्या लढ्यात कांही ग्रामस्थांनी इंग्रजांना मदत केली म्हणून क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर नजर ठेवली होती असे बोलले जाते. परंतु गावचा सामाजिक क्षेत्रात व चळवळीत हिरीरीने सहभाग आहे. गावाला शैक्षणिक वारसा आहे. संत परंपरा मोठी आहे. येथील हभप हरी देसाई यांनी संत तुकारामांच्या विचारानूसार कर्मकांडाला फाटा देत वारकरी परंपरेची बीजे रोवली.त्यामुळे अखंडपणे दरवर्षी तुकाराम महाराजांच्या बीजाचा सोहळा संपन्न होतो. या तुकाराम बीज सोहळ्यासाठी आजरा शहरातून मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आली असून याचा लाभ भावी भक्तांनी घ्यावा असे आवाहन वाहतूक सेवकांच्या कडून करण्यात आले आहे.