HomeUncategorizedआता तरी मिळेल का.? दुर्गंधीचा पासून दिलासा.- आजरा रहिवासी कचरा टेम्पोच्या दुर्गंधीला...

आता तरी मिळेल का.? दुर्गंधीचा पासून दिलासा.- आजरा रहिवासी कचरा टेम्पोच्या दुर्गंधीला त्रस्त .

आता तरी मिळेल का.? दुर्गंधीचा पासून दिलासा.- आजरा रहिवासी कचरा टेम्पोच्या दुर्गंधीला त्रस्त .

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील नगरपंचायतचा अंदाधुंद कारभार आरोग्याच्या दृष्टीने घातक असणारा आवंडी कचरा डेपोचे मुख्य रस्ता सोडून बाकीचे सहा रस्ते चर मारून बंद करण्यात आले होते. गेल्या चार महिन्यापासून वेळोवेळी नगर पंचायती कडे तक्रार व लेखी अर्ज देऊनही आवडी तील कचरा डेपोकडे नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांची दुर्लक्षच होते. त्यामुळे आवडी वसाहत ग्रामीण रुग्णालय गांधीनगर व जवळच्याच मैदानावर खेळणारे क्रिकेट प्रेमी यांना दुर्गंधीमुळे फार त्रास होत होता, आजऱ्यातील चिकन सेंटर व इतर कचरा ,भटकी कुत्री मैदानावर घेऊन जात होती तसेच बाजूलाच असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात व गांधीनगर वसाहतीमध्येही भटक्या कुत्र्याने कचरा पसरवला होता. त्यामुळे दि. २६ रोजी सकाळी अन्याय निवारण समितीच्या पदाधिकारी परशराम बामणे व गौरव देशपांडे, अमित येसादे यांच्या उपस्थितीमध्ये, चोरून कचरा टाकणाऱ्या गाड्यांचा सहा रस्ते चर मारून बंद करून टाकले, तरीही रात्री अप रात्री घाणीचा कचरा टाकणारी गाडी तिथे सापडली तर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन देण्यात येईल त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचा पासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे असे श्री बाबने यांनी मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.