HomeUncategorizedग्रामसभा झालेला दाखला द्या. - अन्यथा बोंब - मारो आंदोलन. हरपवडे ग्रामपंचायतचे...

ग्रामसभा झालेला दाखला द्या. – अन्यथा बोंब – मारो आंदोलन. हरपवडे ग्रामपंचायतचे निवेदन.

ग्रामसभा झालेला दाखला द्या. – अन्यथा बोंब – मारो आंदोलन. हरपवडे ग्रामपंचायतचे निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

गटविकास अधिकारी पंचायत समिती, आजरा यांना सरपंच व सदस्य, ग्रामपंचायत हरपवडे, ता. आजरा. यांनी ग्रामसभा झाले असलेचा दाखला न मिळाल्यास ‘बोंब मारो’ आंदोलनाबाबत करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मौजे. ग्रामपंचायत हरपवडे यांची २६ जानेवारी २०२४ रोजी रीतसर ग्रामसभा झालेली आहे. या सभेचा सर्व वृत्तांत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी पंचायत समितीचे साह. गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांचेकडे ग्रामसभेचे प्रोसिडिंग, सह्यांचे प्रोसिडिंग व नोटीस प्रसिद्ध केलेली व दवंडी रजिस्टर इ. सर्व कागदपत्रे सादर केलेली आहेत. तसेच वरील अधिकाऱ्यांनी ग्रामसभेच्या कागदपत्रांची पडताळणी ग्रामपंचायत कर्यालय येथे येऊन केलेली आहे. तसा तपासणी अहवाल गटविकास अधिकारी यांचेकडे सादर केला आहे. परंतु राजकीय दबावापोटी गटविकास अधिकारी दाखला देणेस विलंब लावत असून ते दाखला देणेत टाळाटाळ करत आहेत.

सदर दाखल्याची मागणी ग्रामसेवक यांनी २६ जानेवारी २०२४ पासून केली असून गेली दीड महिना दाखला देणेस टाळाटाळ करत आहेत सदरचा दाखला शुक्रवार दि. १५ मार्च २०२४ रोजी पर्यंत न दिलेस सोमवार दि. १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता पंचायत समिती कार्यालय, आजरा समोर ‘बोंब मारो’ आंदोलन करणेत येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सदर निवेदनाच्या प्रती मुख्यकार्यकारी अधिकारीसो, जि. प. कोल्हापूर, तहसिलदारसो, आजरा, पोलीस उपनिरीक्षकसो, आजरा.यांना देण्यात आले आहेत. यावेळी माजी जि. प. सदस्या सौ. मणिषा गुरव, सरपंच सागर पाटील, उप सरपंच शिवाजी कांबळे, सदस्य आनंदा कदम, गोविंद गुरव, सौ. नंदा गुरव, पुनम पोवार, संगीता जाधव, बाळु संकपाळ, रेश्मा मुल्लाणी, तंटामुक्त मुक्त अध्यक्ष पांडुरंग धाटोंबे, सह ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.