🛑सगुण व निर्गुण भक्तीचा संगम सोहळा चाफवडेत संपन्न. ( संत निरंकारी भवन व गणेश मुर्ती प्राण प्रतिष्ठा व मंदिर चा लोकार्पण सोहळा.)
🛑होऊ घातलेली लोकसभा निवडणूक भाजपकडे गेली तर.- स्वातंत्र्यासाठी दुसरी लढाई लढावी लागेल.- आजरा येथे संविधान बचाव मेळावा.
आजरा.- प्रतिनिधी.

अवघ्या चार वर्षात गावकऱ्यांनी निर्माण केलेल्या नविन चाफवडे वस्ती येथे संत निरंकारी भवन व श्री गणेश मंदिर या वास्तूंची निर्मिती करण्यात आली. धार्मिक व आध्यात्मिक अशा वातावरणात निर्गुण व सगुण भक्तीचा न भुतो ना भविष्य असा संगम सोहळा पहावयास मिळाला.
एक वर्षांत संत निरंकारी मिशन द्वारे सुसज्ज असे सत्संग भवन व लोकसहभागातून सहा महिन्यांत श्री गणेश मंदिर चे बांधकाम करण्यात आले.”निराकार परमात्म्याचा साक्षात्कार करून मानव जातीचे कल्याण करणे” हे उद्दिष्ट ठेवून निरंकारी मिशन कार्य करते. नविन वस्तीतील चाफवडे ग्रामस्थांनी संत निरंकारी भवन बांधकाम साठी २० गुंठे जमीन विनामूल्य बहाल केली. त्या मध्ये निरंकारी मिशन (नवी दिल्ली) द्वारे एक वर्षांत सुसज्ज असे अध्यात्मिक भवन बांधण्यात आले. परम आद. सुखदेव सिंह जी, श्री अमरलाल निरंकारीजी, श्री शहाजी पाटील जी, भिकाजी पाटील जी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. गणेश मुर्ती प्राण प्रतिष्ठा व मंदिर चा लोकार्पण सोहळ्या प्रसंगी विविध गावची एकूण २१ भजनी मंडळे उपस्थित होती. नित्य हरिपाठ,भजन, कीर्तन, दिंडी सोहळ्या सह दोन वेळची भोजन व्यवस्था करण्यात आली. सदर कार्यक्रमास मा.आमदार राजेश पाटील, अण्णाभाऊ संस्था समोरचे अध्यक्ष अशोक चराटी, डॉ.अनिल देशपांडे, अभयसिंह देसाई यांच्यासह तालुक्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली. एक आठवडा चाललेल्या या कार्यक्रमात गावातील लहान – थोरासह ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच मंडळींनी हीरहीरीने सहभाग घेऊन सेवाभाव वृत्तीने दोन्ही कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडले. गावप्रमुख पांडुरंग धडाम हे संत निरंकारी मंडळ आजरा तालुका चे सेवा दल असुन त्यांनी आपले जीवन निरंकारी मिशनच्या कार्यास वाहून घेतले आहे. सदर दोन्ही कार्यक्रमाचे नियोजन श्री धडाम यांनी नियोजन बद्ध केले असून अध्यात्म व धार्मिक कार्याची सांगड घालण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. अध्यात्मिक शक्ती मानवजातीला जगण्याची उर्जा देते तर धार्मिक शक्ती जगण्याचे बळ देते, हे या कार्यक्रमातून दिसून आले. मंदिर लोकार्पण व संत निरंकारी भवन उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.


🛑होऊ घातलेली लोकसभा निवडणूक भाजपकडे गेली तर.- स्वातंत्र्यासाठी दुसरी लढाई लढावी लागेल.- आजरा येथे संविधान बचाव मेळावा.
आजरा.- प्रतिनिधी.

संविधान बचाव दिंडी आजरा येथे आली.या अनुषंगाने गंगामाई वाचनालय सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात उपस्थित नागरिकांच्या प्रतिक्रिया
माजी गोडसाखर संचालक – अमर चव्हाण: भावनांशी खेळून मते मागितली जात आहे.संविधान व लोकशाही संपविण्याचा डाव केला जात आहे.हुकूमशाही आणली जाणार आहे.जर २०२४ ची निवडणूक भाजपकडे गेली तर पुन्हा आपणाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढाई लढावी लागेल.
कॉ.संजय तर्डेकर : घटना सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपचा पराभव करणे आवश्यक
कॉ.संपत देसाई म्हणाले :
संविधान पायदळी तुडवीली जात आहे.वैज्ञानिक जाणिव नसणारे आपले पंतप्रधान आहेत. स्वातंत्र्य अबाधित राहिलेले नाही.समान अधिकार,समता, स्त्री सन्मान व मुलभूत अधिकार नाकारला जात आहे.
माजी जि. प. अध्यक्ष म्हणाले.- उमेश आपटे
सोशल मिडियावर खोट्या बातम्या भाजप कडून दिल्या जात आहेत.जि.प.व इतर निवडणूका टाळल्या जात आहेत.जनतेला लाचार बनविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.सत्ता मिळवण्यासाठी ईडीचा गैरवापर केला जात आहे.संविधान पळविण्याची तयारी सुरू आहे.हीच वेळ आहे संविधान वाचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.
सुनिल शिंत्रे जिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा म्हणाले: – मोघल व इंग्रज असताना हिंदू अडचणीत होता असे म्हणतात पण आता मात्र ओरड केली जात आहे. या मेळाव्यास जयवंतराव शिंपी, मुकुंद देसाई, विद्याधर गुरबे, अभिषेक शिंपी, संभाजी पाटील ,राजू सावंत, संजय सावंत, नौशाद बुड्डेखान, सलिम लतिफ, रणजित देसाई, विक्रम देसाई, हरिबा कांबळे, युवराज पोवार,कैय्युम बुड्डेखान व कार्यकर्ते उपस्थित होते. समीर चाॅंद यांनी सुत्रसंचालन केले.