भारत महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया.- खासदार धनंजय महाडिक.
आजरा.- प्रतिनिधी.
भारत महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया. पक्ष उमेदवार देईल त्या उमेदवाराला विजय करून पाठवण्याची जबाबदारी आपली आहे. असे वक्तव्य आजरा येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना खासदार धनंजय महाडिक अध्यक्षपदावरून बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले अनेक वर्षापासून देशात काँग्रेसने सडक, बिजली, वीज गरिबी हटवू अशा घोषणा केल्या पण प्रत्यक्षात भ्रष्टाचार केल्याने जनतेने त्यांना नाकारले आहे. सध्या देशात गोरगरीब जनते ला गरिबातून बाहेर काढण्याचे काम मोदी यांनी केले आहे. देशामध्ये आज प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात भाजपची कार्यालय आहेत. या कार्यालयातूनच आपली सर्व कामे होतील शासकीय कार्यालयात जाण्याची गरज आपल्याला भासणार नाही. आपण त्या कार्यालयाचा लाभ घ्यावा. भाजपचे जिल्ह्याचे नेते अशोक चराटी त्यांचा हेतू शुद्ध आहे. चराटी यांनी काही मत व्यक्त केली भविष्यकाळात यापुढील समस्या आम्ही सोडवू आजरा तालुका विचारवंतांचा तालुका आहे. यामध्ये आपल्या सारख्या नेतृत्वाला ताकद देण्याची गरज असल्याचे यावेळी बोलताना खासदार श्री महाडिक म्हणाले.
यावेळी माजी मंत्री भरमु पाटील म्हणाले प्रधानमंत्री मोदीजींना ताकद देणे हे आपलं काम आहे. आण्णा – भाऊ गुर्पला साथ दिली पाहिजे तालुक्याचा जिल्ह्याचा देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करुया असे श्री पाटील म्हणाले.
यावेळी भाजपचे नेते समरजीत घाटगे म्हणाले रस्ते विकासासोबत सर्व स्तरातील जनतेचा विकास होत आहे. कोल्हापूर मधील विमानतळ झाले यांचे सर्व क्षेय हे खास. धनंजय महाडिक यांचे आहे. पण तेही कोणीतरी घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. सोबत देशातील विकास तर झाले पण राम मंदिर देखील झाले. या देशात आणखी काही वर्ष क्राॅग्रेस असतं तर राम – लल्ला काल्पनिक आहेत असे म्हटले असते. देश महासत्ता करायचा असेल तर पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं काळाची गरज असल्याचे बोलताना श्री घाटगे म्हणाले.
स्वागत व प्रास्ताविक करताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांनी आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत बोगस मतदान करुन विरोधकांनी विजय मिळवला व आम्ही तक्रार करुनही आमचे काही चालले नाही अशी खंत व्यक्त करत निवडणूकीत घटलेल्या घटना व यापूर्वी दोन वेळा सत्तेवर असताना आमचा पराभव कसा होऊ शकतो. तालुक्यात आमचा गट एक नं १ असताना अशा घटनेमुळे कार्यकर्तेचे खच्चीकरण होत आहे. यासाठी पक्षाने पाठीशी उभे राहावे. आम्ही मोदींजीच्या सोबतच असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी व्यासपीठावर आजरा, गडहिंग्लज, चंदगड विभागातील सर्व भाजप पक्षाचे पदाधिकारी आण्णा भाऊ संस्था समुहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड पत्र देण्यात आली.
सुत्रसंचलन अनिल कांबळे यांनी केले आभार संभाजी सरदेसाई यांनी मानले.
