मागासवर्गीय व दिव्यांगांसाठी झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन वाटप कल्याणकारी योजना.पहा तर
मुंबई.- प्रतिनिधी.
समाजात असे काही घटक असतात ज्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजना आखत असते. कारण समाजातील काही घटकांना उदरनिर्वाह करता यावा यासाठी शासनालाच काही योजना आखाव्या लागतात. जेणेकरून समाजातील हा आर्थिक दुर्बल असलेला गट पुढे येऊ शकेल. आर्थिक विकास करु शकेल. महाराष्ट्र शासन अशा प्रवर्गासाठी नेहमीच काहीना काही योजना आखत आले आहे. त्याचाच एक भग म्हणजे. महाराष्ट्र शासन समाजकल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यांतीलच एक योजना म्हणजे झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन वाटप योजना. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल.
काय आहे ही योजना?
झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन वाटप योजना ही समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाणारी योजना आहे. या योजनेचा लाभ केवळ दिव्यांग व्यक्ती आणि मागासवर्गीय कुटुंबांनाच मिळणार आहे. दिव्यांग किंवा मागासवर्गीय तरुण तरुणींचा आर्थिक विकास व्हावा. त्यांना आर्थिकदृष्ट्या त्यांच्या पायावर उभं राहता यावं यासाठी ही योजना असून समाज कल्याण विभागातर्फे या योजनेसाठी लाभार्थ्यांना 100% अनुदान देण्यात येते. सध्या झेरॉक्सचा व्यवसाय उत्तम पैसे मिळवून देणार आहे. तसेच शिलाई मशीनच्या माध्यमातून देखील कपडे शिवण्याचा व्यवसाय करता येऊ शकतो.यासाठीच शासनाने ही योजना सुरु केली आहे. जेणेकरुन दिव्यांग आणि मागासवर्गीयांना आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळावे.
झेरॉक्स व शिलाई मशीन 100% अनुदान योजनेचे निकष.
लाभार्थी दिव्यांग किंवा मागासवर्गीय असावा.
अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण ते 60 वर्षे इतके असावे
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे
झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन 100% अनुदान योजनेकरीता आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड
जातीचा दाखला
अपंग असल्याचा दाखला
शाळा सोडल्याचा दाखला
ग्रामसभेचा ठराव
रहिवाशी दाखला
उत्पन्नाचा दाखला
झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन करिता आवश्यक पात्रता
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जात असल्याने, महाराष्ट्राच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेअंतर्गत केवळ मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तीच अर्ज करु शकतात.
इतर प्रवर्गातील नागरिक या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत.
झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन योजना अर्ज कुठे करावा?
झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन योजनेसाठी तुम्ही अर्ज करु इच्छीत असाल तर या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
कार्यालयात जाऊनच तुम्हाल अर्जाचा फॉर्म दिला जाईल.
अर्ज करायला जाताना वर सांगितलेली सर्व कागदपत्रे सोबत असणे अनिवार्य आहे
अर्ज करण्याची अंतीम तारीख
झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन 100% अनुदान या योजनेसाठी दिनांक 31 मार्च 2024 पर्यंतच अर्ज करता येईल. त्यानंतर पाठवण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
योजनेचा फायदा.
झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन 100% अनुदान योजनेमुळे अनेक दिव्यांग तरुणांना रोजगार निर्माण करता येईल.
त्यांना स्वतःचे व कुटुंबियांचे उदरभरण करता येईल.
रोजगार नसल्याने दिव्यांग किंवा मागासवर्गीय तरुण तरुणी चुकीच्या मार्गाल लागणार नाहीत. उलट अशा योजनांचा फायदा करुन घेऊन आत्मनिर्भर होऊ शकतील.