बांधकाम कामगारांना योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळावा मंत्री मुश्रीफ यांचे स्वप्न.- आनंद घाटगे
( मडिलगेत बांधकाम कामगार भांडी संच वाटप. )
आजरा.- प्रतिनिधी.
बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्वप्न आहे. समाजातील पात्र लाभार्थ्याला तो लाभ मिळवून देण्यासाठी काम करणे ही आमची कार्यकर्ते म्हणून जबाबदारी असल्याचे मडिलगे तालुका आजरा येथे भांडी संच वाटप कार्यक्रम व या योजनेची माहिती देताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आनंद घाटगे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती भिकाजी गुरव होते. स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच शिवाजी गुरव यांनी केले यावेळी बोलताना श्री घाटगे म्हणाले अनेक योजनेची लाभार्थ्यांना माहिती नसते यामुळे सदर लाभार्थी आपल्या लाभापासून वंचित राहतो यामुळे मुळात ही योजना काय आहे मंत्री हसन मुश्रीफ कामगार मंत्री असताना या खात्याचा उपयोग समाजासाठी किती चांगल्या पद्धतीने केला आहे. म्हणून या योजनेची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. व यासाठी लागणारी कागदपत्रे आपण देऊन सदर योजनेचा लाभ घ्यावा. मडिलगे गावातील सर्व बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे. आपण कोणत्या गटाचे, कोणत्या पक्षाचे, यापेक्षा आपण या मतदारसंघातील व गावचे नागरिक म्हणून आपल्याला लाभ मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. या योजनेमध्ये
शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी शिष्यवृत्ती, संसार सट, महिला बांधकाम कामगार किंवा महिलांसाठी प्रस्तुती अर्थसहाय्य, बांधकाम कामगाराच्या लग्नासाठी अर्थसहाय्य, बांधकाम कामगार विमा अर्थसहाय्य, बांधकाम कामगार घर बांधणीसाठी अर्थसहाय्य तसेच नवीन बांधकाम कामगार नोंदणी, बांधकाम कामगार नुतनीकरण अशा अनेक योजनांचा लाभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहाय्याने आपणास मिळवुन देण्यास प्रयत्नशील आहोत. मडिलगे गावातील एकही बांधकाम कामगार व ग्रामस्थ वंचित राहणार नाही. व राहू नये पण लाभार्थी आहात आपल्या हक्काचा लाभ आपल्याला शासन देत आहे.
