जंगलाला वनवा लावणारा हालेवाडीतील आरोपी ताब्यात.- गुन्हा दाखल.
आजरा.- प्रतिनिधी.
हालेवाडी तालुका आजरा येथील जंगलाला वनवा लावणारा आरोपी वनविभागाने ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार दि.०८/०३/२०२४ रोजी
आजरा वनपरिक्षेत्रातील वनपाल उत्तर आजरा, वनरक्षक साळगांव, वनमजूर साळगांव हे हत्ती हाकारा टीम समवेत वनक्षेत्रात गस्त घालत असताना नियतक्षेत्र साळगांव येथील मौ. पेरणोली जं.क.क्र.१६०, १६१ वनक्षेत्रात आग लावणेचा प्रकार आरोपी समीर मानकु पन्हाळकर, व. व. ३७, रा. हालेवाडी, ता. आजरा यांनी केलेने त्यांचेवर वनरक्षक साळगांव यांनी प्र.गु.क्र.एफ- ०१/२०२४ भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१)चा ब, क, ड महाराष्ट्र वर्नानयमावली ३,४,५,६ अन्वये गुन्हा दाखल केला. सदर आरोपीकडून जागेवर १ आगपेटी (माचिस), १ मोबाईल, TVS Radeon कंपनीची मोटर सायकल क्र.MH०९ FX ५२१३ जप्त केली आहे.


सदरची कारवाई हो मा, उपवनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर, मा. सहाय्यक वनसंरक्षक (खा. कु.तो. व वन्यजीव) कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे मार्गदशनाखाली केली असून पूढील तपास श्रीम. स्मिता. रा. डाके वनक्षेत्रपाल आजरा, श्री. बाळेश बा. न्हावी वनपाल उत्तर आजरा व श्रीम. अस्मिता शं. घोरपडे वनरक्षक साळगांव हे करत आहे. सोबत वनमजूर श्री. मारूती शंकर शिंदे, श्री. सुरेश राजाराम पताडे व हत्ती हाकारा टीममधील श्री. प्रविण सट्ट कांबळे, श्री. साहिल मधुकर डेळेकर, श्री. शिवाजी मधूकर मटकर, श्री. विष्णु काशिनाथ कांबळे, श्री. विनायक सुरेश पताडे.
