आजरा /मलिग्रे येथील चाळोबा डोंगरावर, महाशिवरात्रीला महाप्रसादाचे आयोजन.
आजरा.- प्रतिनिधी.
मलिग्रे ता.आजरा येथील श्री चाळोबा देवाची डोंगरावरील यात्रा शनिवार दिनांक ९ मार्च रोजी होत आहे. या यात्रे निमित्ताने मलिग्रे ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. याचा लाभ गावातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तानी घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी व मलिग्रे ग्रामपंचायत च्या माध्यमातून केले आहे.


मलिग्रे गावच्या पश्चिमेला डोंगरावर महादेवाचे व चाळोबाचे जागृत देवस्थान आहे. या देवाची यात्रा पिढ्यान् पिढ्या दरवर्षी महाशिवरात्रच्या दुसर्या दिवसी मोठ्या ऊत्साह संपन्न होत असते. शुक्रवार महाशिवरात्र दिवसी यात्रेच्या निमित्ताने गावातील महाप्रसादाचे साहित्य पोहच करणेचे असून रात्री जागर साठी संगीत भजनाचा कार्यक्रम होईल शनिवार सकाळी भक्ती पुजा होईल तर गावातील भाविकांनी सकाळी मंदिरातील पुजा आवरून सकाळी नऊ वाजता पालखी चाळोबा डोंगर कडे प्रस्थान होईल . डोंगरावर विधीवत पुजा झाल्यावर भाविकांना देवदर्शन खुले होईल, दुपारी साडे बारा वाजता प्रभात फेरी नंतर मानकरी व हक्कीमदारांकडून गार्हाने होवून मानाचा बार काढला जाईल व महाप्रसादाचे वाटप सुरू होईल, यासाठी गावातील सर्व भाविक ग्रामस्थ, माहेरवासीनी, पंचक्रोशीतील भाविक याना मलिग्रे ग्रामपंचायत देवस्थान कमिटी यांनी या वर्षी होणार्या यात्रेत महाप्रसादाचा लाभ घ्यावा व यात्रा शांततेने पार पाडावी असें आव्हान केले आहे.
