HomeUncategorizedमुख्यमंत्री आम, खास, यांच्या कार्यक्रमाला एसटी वाहतूक पण सर्वसामान्य माणसाची हेडसाळ.- आजरा...

मुख्यमंत्री आम, खास, यांच्या कार्यक्रमाला एसटी वाहतूक पण सर्वसामान्य माणसाची हेडसाळ.- आजरा मनसेचे निवेदन.🛑केंद्र शाळा तमनाकवाडा शाळेमध्ये महिला दिन संपन्न.🛑कोल्हापूर जिल्ह्यचे खास. संजय मंडलिक यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्या- मंडलिक प्रेमींच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी.🛑मलिग्रे येथील डोंगरावरील चाळोबा व महादेवाची प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्रची यात्रा संपन्न.👇👇

🛑मुख्यमंत्री आम, खास, यांच्या कार्यक्रमाला एसटी वाहतूक पण सर्वसामान्य माणसाची हेडसाळ.- आजरा मनसेचे निवेदन.
🛑केंद्र शाळा तमनाकवाडा शाळेमध्ये महिला दिन संपन्न.
🛑कोल्हापूर जिल्ह्यचे खास. संजय मंडलिक यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्या- मंडलिक प्रेमींच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी.
🛑मलिग्रे येथील डोंगरावरील चाळोबा व महादेवाची प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्रची यात्रा संपन्न.👇👇

आजरा.- प्रतिनिधी

आजरा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुका यांच्या वतीने आजरा आगार व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा अगारात बसची कमतरता असलेने वेळेचे व्यवस्थापण अगदी विस्कळीत झालेले असून यावर त्वरित कार्यवाही करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल तसेच सद्या महामार्गाचे काम युध्द पातळीवर चालू असलेने सर्वत्र रस्त्याची खुप दुरवस्था झालेली आहे. अशा मध्ये आपले वाहन चालक गाडी निष्काळजी पणे चालवताना दिसत आहेत, तर अशा वाहन चालकांवर त्वरित समज देऊन कारवाई करावी. लोकांच्या सेवेसाठी ग्रामीण भागाला जोडणारी आमची एस.टी. टीकली पाहिजे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कठिणबद्ध आहे. मुख्यमंत्री तथा जिल्हयाचे आमदार, खासदार, मंत्री-संत्री कोणीही स्वताच्या पक्षाच्या विविध कार्यक्रमासाठी बसेस मागवतात त्यावेळी ठामपणे आपल्या विभागातून नकार देणे गरचेजे आहे. आधीच बसेसची कमतरता असलेने विदयार्थी वर्गात व ग्रामिण भागातून प्रवाशांना ये-जा करण्यास खुप त्रास सहन करावा लागतो. याला कारणीभुत नेत्यांसोबत तुम्ही अधीकारी सुद्धा जबाबदार आहात इथून पुढे असे निदर्शनास आल्यास आजरा आगारातून एकही बस बाहेर जाऊ दिली जाणार नाही आणि यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास आपले आजरा आगार व्यवस्थापण जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी आनंदा घंटे तालुका अध्यक्ष, सुधीर सुपल जिल्हा सरचिटणीस तसेच अकुंश लोहार, परशुराम पाथरवट, अश्विन राणे, सुशात पौवार, चंद्रकांत इंगळे सुनिल पाटील सह पदाधिकारी मनसैनिक उपस्थित होते.

🛑कोल्हापूर जिल्ह्यचे खास. संजय मंडलिक यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्या- मंडलिक प्रेमींच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी.

कोल्हापूर प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरीकांचे खासदार म्हणून खासदार संजयदादा मंडलिक यांची ओळख आहे. त्यांनी खासदरकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले असून त्यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्या अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील मंडलिक प्रेमींच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजिक व राजकारणामध्ये स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांचे योगदान मोठे आहे. स्वर्गीय खासदार मंडलिक साहेबांना माननारा मोठा वर्ग कोल्हापूर जिल्ह्यात आहे. ही स्वाभीमानी जनता विद्यमान खासदार संजयदादा मंडलिक यांच्या मागे ठामपणे उभी असून त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी ही सर्व जनता कंबर कसून कामाला लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या समाजकारण, राजकारण सहकारामध्ये संजय मंडलिक यांची एक वेगळी ओळख आहे. जिल्ह्याच्या राजकारण सहकारामध्ये सर्वसमावेशक नेवृत्व म्हणून संजय मंडलिक कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रकगतीसाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विकासाचा आलेख वेगाने वाढतो आहे. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक त्यांनी खासदरकीच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेवून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास केला असून त्यांचेकडे सर्वसमावेशक नेवृत्व कोल्हापूर जिल्हा पाहत होता. आता त्यांच्या नंतर खास. संजयदादा मंडलिक यांचेकडे सुध्दा सर्वसमावेशक नेवृत्व म्हणून कोल्हापूर जिल्हा बघत असून त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेची उमेदवारी द्या अशी मागणी मंडलिक प्रेमी जनतेच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.

🛑केंद्र शाळा तमनाकवाडा शाळेमध्ये महिला दिन संपन्न.

कागल- प्रतिनिधी.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने तमनाकवाडा विद्यामंदिरमध्ये बालसभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनील सुतार होते. सुरुवातीस शाळेची मुख्यमंत्री रिया चौगले हिच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रास्ताविक शिवाजी जाधव यांनी केले. सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, राजमाता जिजाऊ, कल्पना चावला, झाशीची राणी, डाॅ. आनंदीबाई जोशी, हिरकणी, ताराराणी, प्रतिभा पाटील अशा विविध वेषभूषा परिधान करून विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली. बालसभेचे आयोजन बाळकृष्ण जाधव, मजीद जमादार, रत्नदीप पानारी, दीपक माने, संजय यादव यांनी केले. सुनील सुतार यांनी अध्यक्षीय मनोगतांतून महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना महनीय कार्य केलेल्या अनेक महिलांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी-शिक्षक उपस्थित होते. आभार बाळकृष्ण जाधव यांनी मानले.

🛑मलिग्रे येथील डोंगरावरील चाळोबा व महादेवाची प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्रची यात्रा संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

मलिग्रे येथील डोंगरावरील चाळोबा व महादेवाची प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्रच्या दुसर्या दिवसी मोठ्या ऊत्साह संपन्न झाली यावेळी सर्व भाविक भक्ताना महाप्रसादाचे वाटप करणेत आले , सुरुवातीला चाळोबा देवाची पालखी प्रदर्शना करण्यात आली .हा सोहळा पाहण्यासाठी अबालवृद्ध सह महिला व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सहभाग घेतला.यात्रेला बैलगाडीने येण्याची हौस भारी होती .आता बैलगाडीचे प्रमाण कमी झाले पण ट्रॅक्टर टूव्हीलर चारचाकीचे प्रमाण वाढले पारंपारीक वाध्ये अनं चाळोबाच्या नावानं चांगभले च्या गजरात संपूर्ण डोंगर दनानून गेला , नटून थटून आलेल्या मागारणी एकमेकींना भेटून आपुलकीने खुशाली विचारत होत्या .देवाच्या निमित्ताने देवा सारखी मानसं भेटतात. निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला मिळतं, वर्षातून एकदा, यात्रेच्या निमित्ताने गजबजलेला डोंगर बघायला मिळतो. यावर्षी प्रथमच मलिग्रे ग्रामपंचायत व देवस्थान कमिटी ग्रामस्थ मार्फत महाप्रसादाचे आयोजन केले होते .देवाला नारळ नैवेद्य दिल्यानंतर आलेल्या दुकानांतील मेवा घेत फिरणे, गारेगार खाणे, पिपानीच्या आवाजात जयघोषाच्या नादात यात्रा संपते अनं सुरू होतो परतीचा मार्ग. पुढील वर्षीच्या संकल्पना घेऊन यात्रेची सांगता होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.