HomeUncategorizedदेश अबाधित ठेवण्याची ताकद काँग्रेसमध्ये.- विद्याधर गुरबे, (आजरा येथे पर्यावरण काँग्रेस समितीची...

देश अबाधित ठेवण्याची ताकद काँग्रेसमध्ये.- विद्याधर गुरबे, (आजरा येथे पर्यावरण काँग्रेस समितीची निवड.)

देश अबाधित ठेवण्याची ताकद काँग्रेसमध्ये.- विद्याधर गुरबे, (आजरा येथे पर्यावरण काँग्रेस समितीची निवड.)

आजरा.- प्रतिनिधी.

आपला देश विविधतेने नटलेला आहे. काँग्रेसने विविधतेतून एकता जोपासलेली संस्कृती आता मोडीत काढली जात आहे. त्यामूळे देश अबाधित ठेवण्याची ताकद काँग्रेसमध्येच असल्याचे प्रतिपादन जिल्हा काॅग्रेस सरचिटणीस विध्याधर गुरबे यांनी केले. आजरा येथे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कृष्णा सावंत यांची पर्यावरण संवर्धन काॅग्रेस तालूका अध्यक्ष पदी नियुक्तीचे पत्र पर्यावरण जिल्हा अध्यक्ष प्रदीप डकरे याच्या हस्ते देण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी गोकुळाच्या संचालीका अंजनाताई रेडेकर होत्या. गुरबे म्हणाले, शाहु,फुले, आंबेडकरांचे विचार जोपासणारा महाराष्ट्र आहे. काँग्रेसमधून घाण गेल्याने काँग्रेस आता स्वच्छ झाली आहे. काॅग्रेस हा पक्ष सर्वाना सोबत घेऊन वाटचाल करताना पर्यावरणाचा विचार करणारा कार्यकर्ता म्हणून सावंत यांची निवड झाल्याने समाधान आहे. यावेळी प्रदीप डकरे म्हणाले यांनी देशातील आजची परिस्थिती ही भांडवलदाराच्या बाजूने असून सार्वजनिक जमीन जंगल पाणी विकण्याचा घाट घालत आहे. त्या विरोधात आवाज बुलंद करण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धन करून जन जागृती करणेसाठी पर्यावरण काॅग्रेस समिती संघटीत केलेचे सांगितले. यावेळी अंजना रेडेकर, काॅ शांताराम पाटील, इनास फर्नांडीस, कृष्णा सावंत यानी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जनता बँकेचे माजी अध्यक्ष अंकुश पाटील, रविंद्र भाटले,जयवंत पाटील, तानाजी गडकरी जोतीबा सासुलकर, नारायण राणे, आबा पाटील, जानबा धडाम, दौलती राणे, हिंदूराव कांबळे, मनपा बोलके, रघुनाथ कातकर याच्या सह कार्यकर्ते व गिरणी कामगार उपस्थित होते. सुत्रसंचालन संजय घाटगे यांनी केले. आभार ज्ञानदेव गुरव यानी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.