HomeUncategorizedआजरा तालुक्यात लुटमारी, अवैध नसेली पदार्थाची विक्री, वाहन चोरी अशा घटनांना ऊत.-...

आजरा तालुक्यात लुटमारी, अवैध नसेली पदार्थाची विक्री, वाहन चोरी अशा घटनांना ऊत.- आजरा पोलीस स्टेशनने कारवाई करावी. उबाठा शिवसेनेची निवेदनाने मागणी.

आजरा तालुक्यात लुटमारी, अवैध नसेली पदार्थाची विक्री, वाहन चोरी अशा घटनांना ऊत.- आजरा पोलीस स्टेशनने कारवाई करावी. उबाठा शिवसेनेची निवेदनाने मागणी.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यात लुटमारी, अवैध नसेली पदार्थाची विक्री, वाहन चोरी अशा घटनांना ऊत आला आहे. याबाबत आजरा पोलीस स्टेशन कारवाई करावी अशी मागणी उबाठा शिवसेनेची निवेदनाने केली आहे. आजरा पोलीस स्टेशन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निवेदन देत अहोत आजरा तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून व काही महिन्यांनपासून वेगवेगळ्या गुन्हेगारी मध्ये वाढ होऊ लागली आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे. कि नाही. याच आत्मपरिक्षण करण्याची नागरिकांच्यावर वेळ आली आज वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडत आहेत. शालेय विद्यार्थीना, तरुण वर्गाला आजरा शहराच्या परिसरात नशेचे पदार्थ सेवन करून वाया जात आहेत. यांना नशेचे पदार्थ पुरवठा करणारी टोळी यांचा पत्ता लागत नाही. तसेच अपरात्री महिला/पुरुष यांच्या टोळया मोटर सायकल स्वारांना अडवून व मारहाण करूण लूट करत आहेत. त्याच बरोबर दिवसा ढवळ्या मोटारसायकल चोरी, घरफोडी, बाजार दिवशी पाकिटमारी असे प्रकार बाढ़ असताना देखील पोलीस प्रशासन जागे होणार की नाही. असे जनतेला वाटत आहे. यामुळे आमच्या खाली मागण्या आहेत की,
१) वाटसरू कडून होणाऱ्या लुटमारी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा.
२) नशेली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा तपास करावा. २
३) घरफोडी व मोटर सायकल चोरांवर तातडीने तपास करून कारवाई करावी.
४) आजरा-आंबोली रोडवर गवसे नजीक एका ठिकाणी काही पोलीस अधिकारी वाहन धारकाला
अडवणूक करून दंड आकारण्यात येत आहे. सदरचे पोलीस कोणत्या अनुषगांने व ते कोणत्या विभागाचे आहेत याची चौकशी होऊन खुलासा व्हावा. तरी वरील केलेल्या मागणी प्रमाणे आपल्या वरिष्ठ अधिकारी यांना माहिती द्यावी. व चालु असेला गुन्हेगारी ताबडतोब थांबवावी अन्यथा उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व ता.प्रमुख युवराज पोवार यांच्या नेतृत्वाखाली आजरा पोलीस स्टेशन समोर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेने कडून निर्देशने करण्यात येतील याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदस्य निवेदन आजरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले यावेळी ओंकार माद्याळकर, शिवसेना शहर प्रमुख, महेश पाटील युवासेना, भिकाजी विभुते शिवसेना उपशहर प्रमुख, दयानंद भोपळे आरोग्यसेवा तालुका, समीर चांद, शिवसेना उपशहर प्रमुख
रोहण गिरी युवासेना शहर प्रमुख,
रोहित यादव शिवसेना शाखा प्रमुख सह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.