HomeUncategorizedछत्रपती शाहूंच्या अपेक्षित असलेल्या शाश्वत विकासासाठी साथ द्या. - समरजित घाटगे यांचे...

छत्रपती शाहूंच्या अपेक्षित असलेल्या शाश्वत विकासासाठी साथ द्या. – समरजित घाटगे यांचे आवाहन .(बहिरेवाडी (ता.आजरा) येथे श्री घाटगे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३२ लाख रूपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न.)

छत्रपती शाहूंच्या अपेक्षित असलेल्या शाश्वत विकासासाठी साथ द्या. – समरजित घाटगे यांचे आवाहन .(बहिरेवाडी (ता.आजरा) येथे श्री घाटगे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३२ लाख रूपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न.)

आजरा. प्रतिनिधी.

केवळ रस्ते आणि गटर्सची कामे ही गावच्या सर्वांगीण विकासाची व्याख्या म्हणता येणार नाही. त्यासाठी आरोग्य,प्राथमिक शिक्षण, वैद्यकीय सुविधा, शासकीय योजनांच्या लाभांसाठी आवश्यक विविध दाखल्यांचे वाटप या महत्वपूर्ण सुविधा तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.त्यामुळे येत्या काळात छत्रपती शाहू महाराजांना अपेक्षित असणारा शाश्वत विकास करण्यासाठी आपला लोकसेवक म्हणून काम करण्याची संधी द्या असे आवाहन भाजपाचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले. बहिरेवाडी (ता.आजरा) येथे श्री घाटगे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३२ लाख रूपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक शाळेची नूतन खोली, सोलार हायमास्ट आणि प्राथमिक शाळेसाठी राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन मार्फत ई लर्निंग संच राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

श्री.घाटगे पुढे म्हणाले,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा गुणवत्तेतील आलेख पाहता वाखाणण्याजोगा आहे.या गुणवत्तेला शाळांमधूनच सुविधांची जोड दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी देशपातळीवर नक्की चमकतील.विद्यार्थ्यांना या अध्ययावत सुविधा देण्यासाठी येत्या काळात आपण काम करणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना अण्णाभाऊ संस्था समूहाचे अध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशोक चराटी म्हणाले, लहानांपासून वृद्धांपर्यंत या कार्यक्रमासाठी मोठी उपस्थिती आहे. ही नक्कीच बदलत्या राजकीय काळाची नांदी म्हणावी लागेल. त्यामुळे येत्या काळात राजकारणात बदल तर होईलच, शिवाय या परिसराचा विकासही येथील जनतेच्या अपेक्षेप्रमाणे श्री .घाटगे यांच्या नेतृत्वाखाली नक्की होईल असा विश्वास व्यक्त केला. भाजपाचे आजरा तालुका सरचिटणीस अतिषकुमार देसाई, राजकीय सल्लागार प्रकाश बेलवाडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय धुरे, संतोष बेलवाडे,स्मिता पाटील( सरपंच होन्याळी ) धोंडीराम सावंत, महादेव रामाने, सेवानिवृत्त कर्नल अशोक बाबर,ग्रा.पं.सदस्य सौ. उषा सुतार, युवराज कांबळे ,सुनील गोरूले, निवृत्ती कापसे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्यासह कार्यकर्ते,महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक ग्रा.पं. सदस्य सुहास चौगुले यांनी केले. आभार अरविंद मिसाळ यांनी मानले.

चौकट.

 राजेंमुळेच उजळले गावचे
 प्रवेशद्वार.....

     आमचे नेते राजे समरजितसिंह घाटगे हे तळागाळापर्यंत पोहोचणारे नेते आहेत. ग्रामीण भागातील गरजांची त्यांची पारख चांगली आहे. अनेक वर्षांपासून आमच्या गावचे प्रवेशद्वार अंधारात होते. गावची ही गरज ओळखून प्रवेशद्वारावरच राजेंनी हायमास्ट दिव्यांची उभारणी करून प्रवेशद्वार उजळून टाकले असल्याचे अशोक कोणकिरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.