Homeकोंकण - ठाणेभाजपच्या लोकसभेच्या पहिल्या यादीतून दिग्गज ना. गडकरी सह अनेक मंत्र्यांना डच्चू पहा..👇👇

भाजपच्या लोकसभेच्या पहिल्या यादीतून दिग्गज ना. गडकरी सह अनेक मंत्र्यांना डच्चू पहा..👇👇

भाजपच्या लोकसभेच्या पहिल्या यादीतून दिग्गज ना. गडकरी सह अनेक मंत्र्यांना डच्चू पहा..👇👇

नवी दिल्ली. वृत्तसंस्था.

भाजपच्या पहिल्या यादीतून दिग्गज मंत्र्यांना डच्चू
सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. अनेक राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत असताना काल मात्र, भाजपाने आघाडी घेत त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. १९५ जणांच्या या यादीत अनेक दिग्गजांना संधी देण्यात आली आहे तर अनेक बड्या नेत्यांना वगळण्यात आले आहे. यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहे. या यादीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सितारमण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर याशिवाय मंत्री अनुराग ठाकूर, नारायण राणे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना वगळण्यात आले आहे. भाजपातर्फे लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. सर्व नेत्यांना निवडणूक तयारीच्या सूचना देखील केल्या आहेत. शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या १९५ उमेदवारांच्या यादीत अनेक केंद्रीय मंत्र्यांची नावे आहेत. मात्र, काम करण्यात आघाडीचे असणाऱ्या गडकरी यांना या पहिल्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यांच्यासह सितारमण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अनुराग ठाकूर यांनाही तिकीट दिलेले नाही. दरम्यान, भाजपाच्या पहिल्या यादीत नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून तिकीट देण्यात आले आहे. तर अमित शहा हे गांधीनगर येथून निवडणूक लढवणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.