इमारत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना मडिलगेत भांडी संच वाटप.- प्रमुख उपस्थिती ( शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे..)
आजरा.- प्रतिनिधी.

कागल विधानसभा मतदारसंघातील व उत्तुर जि. प. मधील मडिलगे येथे शाहू ग्रुप, कागलचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व लोकमान्य समूह, मडिलगे यांच्या प्रयत्नातुन शनिवार बांधकाम कामगारांना भांडीसंच वाटप कार्यक्रम वाचनालय येथे श्री घाटगे व आण्णा भाऊ संस्था समुहाचे अध्यक्ष अशोक चराटी यांचे हस्ते शनिवारी सायं ७.०० वाजता सरस्वती वाचनालय मडिलगे येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री घाटगे म्हणाले या योजनेबाबत जेष्ठ नेत्यांचे अभिनंदन करत कोणत्याही योजनेचा लाभ देताना कमिशन घेऊन काम करणारी मंडळी आहेत. पण आम्ही या योजनेचा लाभ मोफत दिला आहे. उर्वरित लाभार्थी यांना लवकरच लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या मतदार संघातील शेवटच्या लाभार्थी पर्यंत पोहचणार अहोत. असे बोलताना श्री घाटगे म्हणाले

यावेळी बोलताना श्री चराटी म्हणाले मडिलगेतुन आज शंभर कुटुंबातील लाभार्थ्यांना भांडी संच मिळत आहे. आनंद होतो या योजनेचा पण ज्यांनी हि योजना आपल्याला मिळवून दिली त्यांना येणाऱ्या निवडणुकीत समरजीत घाटगे यांना मतदान करा..त्याचं मत तुमच्या चेहऱ्यावर आनंद पहाणार उमेदवारांना मतदान करा. काही लोकांनी या योजनेत कमिशन घेऊन काम करत आहेत. पण श्री निऊगरे यांनी मोफत लाभ मिळवून दिला आहे. त्या समरजीत राजेंनी विजय करा. असे श्री चराटी यांनी अवाहन केले.
यावेळी अतिशकुमार देसाई, कागल विधानसभा व उत्तुर जि. पण. मधील शंभर लाभार्थी तसेच लोकमान्य संस्था समुहाचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक श्री निऊगरे यांनी केले तर सुत्रसंचलन विजय परुळेकर यांनी केले रणजीत मोहिते यांनी आभार मानले. यावेळी प्राथमिक स्वरूपात प्रमुख क्रमांक हस्ते भांडी संच वाटप करण्यात आला.

