उत्तूर जि.प.मतदार संघातील इमारत बांधकाम कामगारांचा थम इंप्रेशन कँम्प कार्यक्रम संपन्न.
( बांधकाम कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. )
आजरा. प्रतिनिधी.

आजरा कागल विधानसभा मतदारसंघातील उत्तूर जि.प मध्ये महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व शिषेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातुन शनिवार दिनांक ०२/०३/ २०२४ रोजी बांधकाम कामगारांना भांडीसंच मिळणेसाठी उत्तूर येथे थम इंम्प्रेशन कँम्प आयोजीत करण्यात आला होता. या कॅमसाठी उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघातील बांधकाम कामगार लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी बांधकाम कामगारांच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी गावोगावी बांधकाम कामगार नोंदणी करण्यात आली होती. तसेच जे जे लाभ या बांधकाम कामगार लाभार्थी यांना. पहिल्या टप्प्यात बांधकाम कामगाराला लागणारे साहित्य वाटप महाराष्ट्रात सर्वात जास्त नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कागल विधानसभा मतदारसंघात करण्यात आले होते.

यानंतर बांधकाम कामगार यांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून देण्याचे काम करण्यात आले होते. आज रोजी याच बांधकाम कामगारांना घरगुती भांडी संच वाटप करण्यासाठी थम कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या कॅम्पला आमदार हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन त्यांचे उद्घाटन व बांधकाम कामगारांचे स्वागत केले.
या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी उत्तर जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावातील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी तसेच ना. हसन मुश्रीफ फाउंडेशन यांच्या माध्यमातून वसंतराव धुरे, शिरीष देसाई, काशीनाथ तेली, दीपक देसाई, सुनील दिवटे, अंबाजी गुरव, संजय गाडे, आनंद घाटगे, बापू निऊगरे, शिवाजी गुरव, पांडुरंग तोरगल्ले, सुधीर सावंत, विश्वनाथ कांबळे, तसेच हसन मुश्रीफ फाउंडेशन सर्व स्टाफ यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.


