HomeUncategorizedमा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत मतदार संघातील 37 ग्रामपंचायतीच्या बांधकामास...

मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत मतदार संघातील 37 ग्रामपंचायतीच्या बांधकामास 7 कोटी 75 लाख निधी मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर🛑कासार कोळवण बावनदी पूल व्हावा. – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ग्रामस्थांचे निवेदन.

🛑मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत मतदार संघातील 37 ग्रामपंचायतीच्या बांधकामास 7 कोटी 75 लाख निधी मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर
🛑कासार कोळवण बावनदी पूल व्हावा. – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ग्रामस्थांचे निवेदन.

कोल्हापूर प्रतिनिधी.

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत मतदार संघातील 37 ग्रामपंचायतीच्या बांधकामास 7 कोटी 75 लाख निधी मंजूर झाला आहे. लहान गावांत आणि ग्रुप ग्रामपंचायतींना अद्यापही स्वत:ची इमारत नसल्याने त्या खाजगी जागेत कार्यरत आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार करताना अनेक अडचणी येतात. यामुळे ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत असावी याकरीता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राधानगरी तालुक्यातील 11, भुदरगड 17 व आजरा तालुक्यातील 9 अशा 37 ग्रामपंचायतीच्या इमारती बांधणेसाठी 7 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला सल्याची आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. की, राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाहीत अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेल्या मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला मंजूरी दिली आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या स्त्रोतांची मर्यादा विचारात घेऊन राज्य सरकारने राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारती नाहीत अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी ‘मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री’ ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. ग्रामविकास विभागाच्या दि.26 फेब्रुवारी, 2024 रोजी झालेल्या शासननिर्णयानुसार सदर ग्रामपंचायतींना मंजूरी मिळालेली असून लवकर या ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाला सुरवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या योजनेतंर्गत राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण, फेजिवडे, तळगाव, खिंडी व्हरवडे, कपिलेश्वर, कासारवाडा, ऐनी, फराळे, पिरळ, कुडूत्री, धामोड या 11 गावांचा समावेश आहे. भुदरगड तालुक्यातील पारदेवाडी, दोनवडे, टिक्केवाडी, मिणचे बुद्रुक, दारवाड, करडवाडी, निष्णप, आंबवणे, पळशिवणे, बेगवडे, नागणवाडी, देऊळवाडी, कोनवडे, नवरसवाडी, कलनाकवाडी, पाळ्याचाहुड्डा, शिवडाव या 17 गावांचा समावेश आहे. आजरा तालुक्यातील हाजगोळी बुद्रुक, खेडे, चांदेवाडी, कोरीवडे, साळगांव, हाळोली, पेरणोली, वेळवट्टी, गवसे या 9 गावांचा समावेश आहे.

🛑कासार कोळवण बावनदी पूल व्हावा. – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ग्रामस्थांचे निवेदन
(सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, उदय सामंत यांची भेट घेऊन दिला विनंती प्रस्ताव.)

मुंबई. प्रतिनिधी (शांताराम गुडेकर )

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख पासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु. पो.कासार कोळवण गाव हे दुर्गम भागात असून सर्व पंचक्रोशीतील लोकांना हा अगदी मोक्याचा मार्ग सुरळीत होईल म्हणून गेली अनेक वर्ष सर्वजण प्रयत्न करीत असलेल्या बावनदीवरील कासार कोळवण येथे आवश्यकता असलेल्या पूलासाठी आज ( दि.२६ फेब्रुवारी ) विधान भवन मध्ये ग्रामपंचायत सरपंच सौ.मानशी महेंद्र करंबेळे, पो.पाटील महेंद्र रामचंद करंबेळे व उपसरपंच प्रकाश धोंडू तोरस्कर यांनी चिपळूण संगमेश्वर मतदार संघांचे आमदार शेखर निकम यांचेसमवेत पूलाचे काम मार्गी लागावे यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. सदर भेटीमध्ये त्यांनी सांगितले की,आम्ही हा ग्रामस्थचा गंभीर व ज्वलंत प्रश्न लवकरच निकाली काढू असे आश्वासन दिले आहे. सोबतच मंत्री सार्वजनीक बांधकाम रविंद्र चव्हाण व उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनाही निवेदने दिली असून लवकरच पूलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करू असे सांगण्यात आले. हा पूल झाला तर कासार कोळवण गावासह वांझोळे,सुतारवाडी,सनगलेवाडी आदी गाव,वाड्या यांना फायदा होणार आहे.कासारकोळवण या गावातील लोकांना देवरुख येथे जाणाऱ्या एस.टी साठी किंवा मुंबईला येण्यासाठी कासारकोळवण एस.टी स्टाँप वर याच पुलाचा वापर करावा लागतो.तसेच शेती कामाला किंवा एखाद्या रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणे/आणणे शिवाय जनता विद्यालय आंगवली या शाळेत इ. ८ वी १० पर्यंत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थीवर्गालाही याच पूलाचा वापर करावा लागत असल्यामुळे येथे पूल होणे आवश्यक आहे.याठिकाणी पूल झाल्यास कासार कोळवण सह पंचक्रोशीतीललच नव्हे तर तालुक्यातील ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल .पर्यायाने गाव व तालुक्याच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.उद्योगांना चालना मिळेल.तरी हा पूल त्वरीत बांधावा अशीच मागणी स्थानिकांसह पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.