HomeUncategorizedराज्यातील हॉटेल कामगार, टेलर व्यावसायीक व नाभिक बांधवांचे स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्यासाठी...

राज्यातील हॉटेल कामगार, टेलर व्यावसायीक व नाभिक बांधवांचे स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्यासाठी बुधवार दि.28 रोजी बैठकीचे आयोजन : आमदार प्रकाश आबिटकर

राज्यातील हॉटेल कामगार, टेलर व्यावसायीक व नाभिक बांधवांचे स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्यासाठी बुधवार दि.28 रोजी बैठकीचे आयोजन : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी प्रतिनिधी.

राज्यातील हॉटेल कामगार, टेलर व्यावसायीक व नाभिक बांधवांकरीता स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्यासाठी बुधवार दि.28 रोजी कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांचेसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी असंघटीत कामगार कल्याण महामंडळ आणि त्याच्या अंतर्गत व्यवसाय, उद्योग क्षेत्रनिहाय 39 आभासी मंडळे स्थापन करण्याबाबतचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या 39 आभासी मंडळांमध्ये हॉटेल कामगार, टेलर व्यावसायीक व नाभिक बांधवांच्या महामंडळाचा समावेश आहे. सदर महामंडळांच्या कामाना प्रत्यक्ष सुरवात करून हॉटेल कामगांर, टेलर व्यावसायीक व नाभिक बांधवांना या महामंडळाचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री नाम.एकनाथजी शिंदे व कामगारमंत्री सुरेश खाडे यांचेकडे पाठपुरावा सुरू होता. परंतू याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. यामुळे दि.28 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय टेलर दिनाचे औचित्य साधून टेलर महामंडळ व हॉटेल कामगार व नाभिक महामंडळाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करणेसाठी बैठकीचे आयोजन करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.