अपंगांच्या न्याय अधिकार-हक्कासाठी लढा उभारणार – संग्राम सावंत.
नेसरी.- प्रतिनिधी.
नेसरी येथील मसणाई मंदिर,नेसरी येथे शनिवार दि. २४ रोजी अपंग/दिव्यांगांच्या प्रश्नासाठी मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने,”अपंगांच्या न्याय्य अधिकार-हक्कासाठी मेळावा”आजरा-गडहिंग्लज-चंदगड तालुकातील लाभार्थ्यांसाठी मेळावा पार पडला. यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत म्हणाले, अपंगांच्या न्याय अधिकार-हक्कासाठी लढा लढा उभारणार आहोत. अपंगांच्या सोयीसुविधा व सवलतीसाठी आणि व्यापक परिवर्तनासाठी द्विव्यांगव अपंग बजेट महाराष्ट्र शासनाने स्वतंत्ररित्या दिले गेले पाहिजे.बजेटमध्ये वाढ करायला हवी आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, जिल्हापरिषद यांनी अपंगांच्यासाठीचा निधी परिपूर्ण व अनुशेषासह ताबडतोब खर्च केला पाहिजे.तसेच अपंगांना गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयातचं प्रमाणपत्र देण्यासाठीची व्यवस्था करायला हवी आहे. यासंदर्भात ठोस पावले प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली पाहिजेत.यासाठी संघटित होऊन. लढा नेटाने उभारण्यासाठी सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करणार आहोत. प्रमुख मार्गदर्शक कॉम्रेड संजय घाटगे सामाजिक कार्यकर्ते म्हणाले, अपंगांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक चळवळी ही तुमच्या लढयाबरोबर राहणार आहे. मुक्ती संघर्ष समिती ही लढाऊ संघटना आहे.तिच्या पाठीशी तुम्ही प्रामाणिकपणे रहा. तुमचे प्रश्न तर सुटणारच शिवाय स्वाभिमानाने जगण्याची हिम्मत तुमच्या मध्ये येणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना प्रकाश गुरव सामाजिक कार्यकर्ते म्हणाले, आज खऱ्या अर्थाने अपंगांच्या लढ्याला आता सुरुवात झालेली आहे आता आपण लढाई जिंकल्याशिवाय थांबणार नाही अपंगांच्या प्रश्नांसाठी एक व्यापक आंदोलन आपण करणार आहोत. आज दिव्यांकांची प्रचंड आला की ची परिस्थिती आहे त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा व इतर गोष्टी देतानाही शासन प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. यावेळी जोतिबा गोरल, चंदगड, रविंद्र भोसले, भारती पवार, साबीर माणगावकर नेसरी, रूजाय डिसोझाआजरा, सुरेश वांद्रे कोवाड तसेच इतर द्विव्यांग बांधवांनी आपली मनोगते व्यक्त केली आहेत.

या मेळाव्यात ठराव मांडण्यात आले. यामध्ये केंद्रीय स्तरावर अपंग आयोगाची स्थापना करणे, अपंग विध्यार्थ्यांना K.G. ते P.G. (प्राथमिक ते उच्च शिक्षण) मोफत करणे, अपंगांचे शिक्षण, प्रशिक्षण व उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ करणे,
जिल्हा परिषद चा निर्वाह भत्ता दिव्यांगांच्या किंवा अपंगांच्या खात्यावर ताबडतोब झाला जमा झालाच पाहिजे., भूमिहीन दिव्यांगांना किंवा अपंगांना गायरान मध्ये अथवा गावठाण मध्ये जागा देऊन त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे
दिव्यांग पुनर्वसन व दिव्यांग हक्क अधिकार कायदा २०१६ अन्वये दिव्यांक कायद्याची पोलीस प्रशासन यांच्याकडून दिव्यांग तक्रारींना दिव्यांग हक्क कायदा ची अंमलबजावणी होण्यासाठी व प्राधान्याने पोलीस प्रशासन ने याबाबतीत कार्यवाही करण्यासाठी दिव्यांगांसाठी अपंगांसाठी असणाऱ्या विविध अपंग कर्ज योजनांची अंमलबजावणी ताबडतोब झाली.पाहिजे,गडहिंग्लज-आजरा-चंदगड-भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद व जिल्हापरिषद यांनी आतापर्यंतच्या आर्थिक वर्षातील दिव्यांग / अपंग कल्याणनिधी शासन निर्णयानुसार सर्व संबंधीत लाभार्थ्यांना वाटप झाला आहे किंवा नाही. आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार तरतूद करण्यात आलेला ५ % राखीव निधी अनुशेषासह त्याचा ताबडतोब विनीयोग झाला पाहिजे.यासाठी पाठपुरावा करण्यासाठी संबंधितांना निवेदन देणार आहोत., प्रत्येक ग्रामपंचायतीने घरफळामध्ये ५० टक्के सवलत दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाला आहे. ती सवलत दिली पाहिजे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे.
देणाऱ्या गोष्टींचे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे, प्रशासनातील चाललेली दप्तर दिरंगाई थांबली पाहिजे. दप्तर दिरंगाई कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे. या लढा मेळाव्याला प्रमुख कार्यकर्ते मुद्दसर वाटंगी,सुरेश खोत,आबुहुरेरा माणगावकर, संजय डोंगरे, बबन चौगुले, जगन नाईक, देवेंद्र कांबळे, सविता पाटील, आक्काताई भोसले,विनायक कोरी अशोक गंगली,मलिक बागवान,ललू मुजावर,मुनाफ सिराज,गौस माणगावकर,अहमद नेसरीकर यांच्यासह आजरा-चंदगड-गडहिंग्लज येथील अपंग / द्विव्यांग समाज बांधव आणि मुक्ती संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
