HomeUncategorizedसोशल मीडिया प्रकरण भोवल व्हाट्सअप चॅटिंग वरून वाद.- पेद्रेवाडी १३ जनाविरुद्ध आजरा...

सोशल मीडिया प्रकरण भोवल व्हाट्सअप चॅटिंग वरून वाद.- पेद्रेवाडी १३ जनाविरुद्ध आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

सोशल मीडिया प्रकरण भोवल व्हाट्सअप चॅटिंग वरून वाद.- पेद्रेवाडी १३ जनाविरुद्ध आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

आजरा.- प्रतिनिधी.

पेद्रेवाडी, ता. आजरा येथे सोशल मीडिया प्रकरण भोवल व्हाट्सअप चॅटिंग वरून वाद.पेद्रेवाडी १३ जनाविरुद्ध आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी निलेश राजाराम हाटवळ ( रा. साईराज बिल्डींग कोपर क्रॉस रोड, डोंबिवली वेस्ट रूम, सध्या मुळगाव पेद्रेवाडी येथे) व त्यांच्या आई श्रीमती सुशिलाबाई यांना गावातील व्हाट्सअप ग्रुपवर झालेल्या चॅटिंग व शिवीगाळ कारणावरून त्यांना घरात घुसून मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी निलेश – हाटवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तेरा जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी…
पेद्रेवाडी गावातील ‘पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ’ नावच्या वॉट्सअप ग्रुपवर गेले कांही दिवस झालेल्या शिवीगाळ, चॅटींगचे पर्यवसान घरात घुसून व त्यानंतर घराबाहेर ओढत आणून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यामध्ये निलेश – हाटवळ व सुशीलाबाई -हाटवळ हे दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सागर गोपाळ शिंत्रे, उत्तम बाबू रेडेकर, सौ. लता रेडेकर, आकाश रेडेकर, गौरव श्रीकांत गाडे, सहदेव गणपती चव्हाण, पृथ्वीराज सहदेव चव्हाण, मनिषा सहदेव चव्हाण, सुनिल विष्णू डोंगरे, साहिल धनाजी आजगेकर, संभाजी अर्जुन देवरकर, आशिष अरु शिंत्रे, निवृत्ती गणपती देवरकर (सर्व रा. पेद्रेवाडी ता आजरा जि. कोल्हापूर) या तेरा जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.