🛑प्रवासांना एसटी सेवा सुरळीत द्या. अन्यथा. – दि. ४ मार्च पासून आजरा बसस्थानकावर बेमुदत उपोषण ( एसटी प्रवासी संघटनेचा निवेदनाने उपोषणाचा इशारा.)
🛑रवळनाथ पतसंस्थेच्या ठेव योजनेला उत्फुर्त प्रतिसाद
(पहिल्याच दिवशी १५ लाखांवर ठेवी जमा )
🛑जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा आगारामार्फत आजरा तालुक्याच्या ग्रामीण भागात एस. टी. फेरी चाढविणे बाबत प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सन १९९८ मध्ये आजरा तालुपातील प्रवारयांचा सोईकरिता आजरा एस.टी. आगाराची निर्मिती करण्यात आली यामाध्यमातू तालुक्यातील नागरिकांचा एस. टी. प्रवास सुखकर व सोईचा तालुक्याच्या वाड्या रस्त्यावरून एस टी धावू लागली कोरोना काळापर्यंत तालुक्यातील एस.टीचे वेळापत्रक चांगल्या पद्धतीने अंमलात आणले जात होते. मात्र कोरोणा काळ व त्यानंतर एस.टी कर्मचारी संप यामुळे आजरा आगाराचे कोलमडलेले एस,टीचे वेळापत्रक अद्यापही कायम आहे. याचा फटका तालुकासियांना बसत आहे. तालुक्यातील बहुतांश नागरिकांना प्रवासासाठी एस. टी प्रवासावर अवलंबून राहावे लागते त्यातच सद्या आपल्या आगारामार्फत कोल्हापूर-पुणे जादा फेऱ्या सुरू आहेत. तसेच आपल्या आगाराकडे गाड्यांची संख्या कमी असल्याचे कारण दिले जाते. मात्र १ मार्च २०२४ पूर्वी आगर तालुक्याच्या ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात व नागरिकांची सोय होईल अशा स्वरुपात एसटीच्या फेऱ्या सुरु कराव्यात अन्यया दि. ४ मार्च २०२४ पासून आजरा बसस्थानक येथे बेमु उपोषण करण्यात येईल या आंदोलनाची होणाऱ्या परिणामांची जबाबदारी आजरा आगार असेल. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर सचिन इंदुलकर , नाथ देसाई, राजु विभुते, आनंदा घंट्टे, विकास सुतार सुयोग बेळगुळकर, अजित आजकेकर, दयानंद भोपळे, विशाल जाधव, दत्तात्रय सावंत, नितीन गावडे जावेद आगलावे सह प्रवासी संघटनेच्या सह्या आहेत.
रवळनाथ पतसंस्थेच्या ठेव योजनेला उत्फुर्त प्रतिसाद
(पहिल्याच दिवशी १५ लाखांवर ठेवी जमा )
आजरा : प्रतिनिधी.

आजरा येथील श्री. रवळनाथ पतसंस्थेत महिलांकरिता हळदीकुंकू कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. यानिमित्त संस्थेच्यावतीने आयोजित महिलांकरिताच्या ठेव योजना उपक्रमास मोठा प्रतिसाद लाभला. एकाच दिवशी तव्वल १५ लाखांवर ठेवी जमा झाल्या. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्या अलकाताई शिंपी होत्या.
श्री. रवळनाथ पतसंस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला महिलांकरिताचा हळदी-कुंकू कार्यक्रम संस्थेच्या सभागृहात पार पडला. हळदी-कुंकू कार्यक्रमास शहरासह ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वागत संस्थेच्या संचालिका माधुरी पाचवडेकर यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेच्या माजी अध्यक्षा सुरेखा फडके यांनी संस्थेच्यावतीने रावविण्यात येणारया विविध उपक्रमासह ठेव व कर्ज योजनांची माहिती दिली. यावेळी बोलताना अध्यक्षीय मनोगतात सौ. शिंपी म्हणाल्या, गावगाड्यातील संस्कृती जोपासण्यासाठी महिलांनी एकत्र येण्याची आवश्यकता असून यानिमित्तानेच हळदी-कुंकू कार्यक्रम ठेवला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
हळदी-कुंकू कार्यकमानिमित्त संस्थेच्यावतीने महिलांना कापडी बॅग व वाण देण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका सिमा पोवार, नंदाताई घोरपडे, सौ. प्रियंका शिंपी, शोभा पटेकर, तेजस्विनी नार्वेकर, कल्पना जाधव, सौ. गिता नाईक, सौ. भैरवी सावंत, सौ. पूजा डोंगरे यासह महिला उपस्थित होत्या. आभार संचालिका सौ. अर्चना मराठे यांनी मानले.
🛑जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.
मोदी सरकारवर गंभीर आरोप करणारे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआयने दिल्लीत ३० ठिकाणी छापे टाकले आहेत. किरू हायड्रो प्रकल्पाच्या घोटाळ्यातील आरोपावरुन ही छापेमारी सुरु असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
🟥सीबीआयच्या धाडीनंतर सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, मागील ३-४ दिवसांपासून मी आजारी असून रुग्णालयात दाखल आहे. अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून माझ्या घरावर छापे टाकले जात आहेत. माझा ड्रायव्हर आणि माझा सहाय्यक यांच्यावरही छापे टाकून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे.
किरु हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पाचे 2019 मध्ये सुमारे 2,200 कोटींना एका खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचा संशय सीबीआयला आहे. या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स लिमिटेडचे माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी, माजी अधिकारी एमएस बाबू, एमके मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
