🛑सर्पनाला आढावा बैठक म्हणजेच एकाच व्यासपीठावर सर्वांना सोबत घेऊन प्रश्न समजून घेऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न.-आम. आबिटकर
🛑फेब्रुवारीतील एकदिवसीय विशेष अधिवेशनात अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे.- मराठा महासंघ.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील सर्पनाला मध्यम प्रकल्प हा हिरणेकेशी नदी खोऱ्यातील सर्पनाल्यावर पारपोली. ता. आजरा या गावांना नजिक बांधण्यात येत असलेला प्रकल्प कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत उर्वरित आहे . येथील काही प्रलंबित प्रश्नाबाबत आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना श्री आबिटकर वीस गावातील सरपंच व प्रकल्पग्रस्त यांच्या समस्या व प्रलंबित प्रश्न व पुढील काम याबाबतची अधिकारी यांना माहिती घेत असताना म्हणाले एकाच व्यासपीठावर बैठक घेऊन एकत्रित प्रश्न मार्गी लावण्याचा हा आढावा बैठकीचा प्रयत्न आहे व या प्रयत्नांना आजपर्यंत यश आले आहे धरण पूर्ण झाल्याने त्याचा फायदा सर्व ग्रामस्थांना होणार आहे. या पाण्याचा उपयोग करून घेण्यासाठी या विभागाकडे आपल्या लागणाऱ्या संबंधित कागदांचा पाठपुरावा करून घ्या. आपले राहिलेले प्रणवित प्रश्न देखील मार्गी लावले आहेत उर्वरित प्रश्न देखील प्रांत अधिकारी मॅडम यांची भूमिका सकारात्मक असल्याने व त्यांचे सहकारी मोलाचे ठरले आहे गतिमान पदाधिकारी व अधिकारी मिळून चांगले काम करूया व लाभ क्षेत्रातील लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ देऊया असे श्री आम. आबिटकर बोलताना म्हणाले.
यावेळी रोहित बांदिवडेकर कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २ यांनी प्रास्ताविकात चालू असलेल्या कामाची माहिती व काही प्रश्न वगळता प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागले असल्याचे माहिती दिली. अभिजीत मेत्रे अधीक्षक अभियंता कोल्हापूर पाटबंधारे मंडळ चालू असलेले व उर्वरित काम व यापुढील प्रकल्पग्रस्तांची लागणारी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी आढावा बैठकीत काही प्रश्न व प्रकल्पग्रस्त समाधानी असल्याचे शेतकरी व सरपंच यांनी मनोगते व्यक्त केली यामध्ये आदेश गुरव पेरणोली, सूर्यकांत दोरूगडे सोहाळे, सुधाकर पाटील शेळप, तसेच प्रकाश कविटकर, इंद्रजीत देसाई वेळवटी, सह सरपंच व शेतकरी यांनी आपली भूमिका व काही प्रश्न उपस्थित करत चालू असलेल्या कामावर समाधानी असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी
स्वाती अरुणकर उपविभागीय अभियंता मध्यम प्रकल्प उपविभाग.क्र ४ , अविनाश फडतारे उपविभागीय अभियंता गडहिंग्लज पाटबंधारे उपविभाग, सहाय्यक अभियंता प्रकाश येसणे तसेच संजय पाटील, विजय थोरवत, संतोष भाटले, जितेंद्र भोसले सह ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मारुती डोंगरे यांनी मानले.
फेब्रुवारीतील एकदिवसीय विशेष अधिवेशनात अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे.- मराठा महासंघ.
आजरा.- प्रतिनिधी.
फेब्रुवारीतील एकदिवसीय विशेष अधिवेशनात अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे.- मराठा महासंघ यांनी राज्यातील मुख्यमंत्री सह संबंधित मंत्री खास. आम. यांना प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दि.२६ जानेवारी २०२४ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनिमय) अधिनियम २०००, अधिसुचना काढण्यात आली आहे. यामध्ये ज्या मराठा व्यक्तींची ‘कुणबी’ नोंद सापडलेली आहे, त्यांचे सगेसोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोताशी लग्नाच्या सोयरीक होतात. ते सर्व सगेसोयरे मात्र सगे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीने नातेवाईक असा घेतला जाईल. तथा लग्नाच्या ज्या सोयरीकी करतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करुन दिल्याची त्याची गृह चौकशी करुन त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. या अधिसूचनेचे रुपांतर कायद्यात करण्यासाठी आपण विधीमंडळाचे/ विधानपरिषदेचे सदस्य म्हणून मराठा समाजासाठी विशेष प्रयत्न करुन हा कायदा पारीत करुन घ्यावा ही नम्र विनंती आहे. हा कायदा पारीत झाल्याने मराठा समाजाचा फायदा होणार आहे. कित्येक वर्षे पिढयानपिढया आरक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाला न्याय मिळणार आहे. या ठिकाणी आपण आग्रहाची भूमिका घेता किंवा नाही याचीही या विशेष अधिवेशनाच्या प्रक्षेपणामधून व बातम्या मधून आम्हाला माहिती होणारच आहे. याकरता आमचे आपणाला आवाहन आहे की हा कायदा पारीत करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करावेत. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष मारुती मोरे सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

