विकासाच्या वाटेपासून वंचित असणाऱ्या.- विकास कामांचा शुभारंभ. आम. प्रकाश आबिटकर.
आजरा.- प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील आंवडी धनगरवाडा रस्ते विकास हा विकासाच्या वाटेपासून वंचित असणाऱ्या विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून आम. प्रकाश आबिटकर बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले वंचित घटकांना प्रकाश झोतात आणण्यासाठी विकास शुभारंभ आहे. अनेकांच्या सामुदायिक सहकाऱ्यांचे यश आहे. तालुक्यातील तीनही धनगरवाडा रस्ते पासून वंचित होते. या ठिकाणी जागतिक वनस्पतीचा वारसा असणाऱ्या वनस्पती पर्यटकांसाठी संधी आहे. म्हणजे धनगरवाडा हे जैवविविधता प्रतिकच आहे. या कामात ठेकेदार यांनी दर्जेदार रस्ते व्हावे याकडे लक्ष द्यावे. कोणत्याही तक्रारी येवू नये. येथील नागरिकांनी विकासाच्या प्रमुख प्रक्रियेत येण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. असे बोलताना आम. श्री आबिटकर म्हणाले.
यावेळी तहसीलदार समीर माने यांनी तहसील विभागातील कामाचा आढावा देत आपली प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अन्य योजनेची माहिती व कामाची अडचणी असल्यास प्रत्यक्ष भेटून आपली कामे करुन घ्यावी. असे तहसीलदार श्री. माने म्हणाले
यावेळी उप. अभियंता राजेंद्र सावंत, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, माजी सरपंच बाबु येडगे, विजय थोरवत, इंद्रजित देसाई, संजय पाटील, दत्ता पाटील, रणजीत देसाई, संतोष भाटले , विलास शिवनगे, गंगाराम यएडगए सह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार कु. शितल कोकरे हिने मानले.


