भादवण महालक्ष्मी देवीच्या भव्य यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. ( ग्रामस्थ, भाविक भक्तांनी यात्रेचा आनंद शांततेत घ्यावा. ग्रामपंचायत, देवस्थान, यात्रा समितीने केले अवाहन. )
आजरा.- प्रतिनिधी.
भादवण ता. आजरा येथील सालाबाद प्रमाणे होणाऱ्या महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व देवस्थान समिती, ग्रामस्थ यांच्या नियोजनाने करण्यात आले आहे. महालक्ष्मी देवीचे यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी इरडे पडण्याची पंरपरा असते सदर इरडे मंगळवार १३ रोजी पडले असून शुक्रवार १६ रोजी महालक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठापना व रात्री ९. वाजल्यानंतर मानाच्या ओट्या भरणे. शनिवार १७ रोजी सकाळी ठीक सात वाजता महालक्ष्मी देवीची भव्य मिरवणूक महालक्ष्मी चौकात असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा महालक्ष्मी मूर्तीची स्थापना रविवार १८ महालक्ष्मी देवीची पावन करण्याचा कार्यक्रम आहे.
या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम म्हणून शनिवार १७ रोजी रात्री १० वा. पहाडी पोवाडा सोबत अंगावर रोमांच आणणारे ऐतिहासिक नाट्यप्रसंग मुद्रा भद्राय राजते शाहीर रंगराव पाटील कोल्हापूर यांचे असून. भादवण प्रीमियर लीग आयोजित २०२४ सीजन ६ भव्य अंडर आर्म सर्कल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अंकुश जोशीलकर व बबन पाटील सह प्रीमियर लिंकच्या सदस्यांनी केले आहे. अंगणवाडी आदर्श विद्या मंदिर व भादवण हायस्कूल आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रम रात्री ८ वा. राज स्पोर्ट स्पोर्टच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त स्लो मोटरसायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महालक्ष्मी देवीच्या मिरवणुकीसाठी पारंपारिक डिंकी व ती ढबाक वाद्य लेझीम व झांज पथक आदर्श विद्यामंदिर भागवत हायस्कूल गावचे प्रमुख मानकरी दिनकर गोडसे गणपती देवलकर संजय पाटील व गावचे सेवेकरी मानकरी असणार आहेत.
भागवत ग्रामस्थ व समस्त भाविक भक्त यांना महालक्ष्मी देवीच्या यात्रेचा शांततेत दर्शन व लाभ घेता यावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन. सरपंच माधुरी गाडे, उपसरपंच संजय पाटील, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी कुंभार, पोलीस पाटील गीता कुंभार, ग्रामसेवक अमृत देसाई व तलाठी रमेश यादव सह ग्रामपंचायत सदस्य तसेच देवस्थान समिती सदस्य दिनकर गोडसे, तानाजी उंडगे, शंकर कोलते, शिवाजी कुंभार, रणजीत गाडे, गणपती देवरकर, बाळकृष्ण सुतार, अमित गुरव, शामराव मुळीक, संभाजी कांबळे, श्रावण पाटील, सिद्धाप्पा जंगम, अशोक गुरव तसेच यात्रा समिती सदस्य डॉ. गोपाळ केसरकर, कारखाना संचालक राजेश जोशीलकर, दत्तात्रय शिवगंड, भिवा जाधव, बेबीताई लोहार, सुजाता खुळे, छाया संकपाळ, पी. के केसरकर, दयानंद पाटील, बी.ए पाटील, हरिबा कुंभार, उत्तम माने, सागर खुळे, नामदेव डोंगरे अमोल कांबळे, प्रकाश शिंदे, श्रीकांत देवेकर, सुधीर जाधव, रवींद्र देसाई, दत्तात्रय पाटील, दीपक खुळे, पुंडलिक मुळीक, दशरथ डोंगरे सुनील मुळीक सुधीर सुतार भैरव शेलार, विठ्ठल पाटील, रामचंद्र पाटील सह यात्रा समिती सदस्य यांनी केले आहे.
