HomeUncategorizedस्त्री शक्ती ग्रामसंघ बोलकेवाडी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.( अनोखा उपक्रम.- विधवा...

स्त्री शक्ती ग्रामसंघ बोलकेवाडी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.( अनोखा उपक्रम.- विधवा महिलांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार.)🛑बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे येथे करीयरच्या वाटा या वर कार्यशाळा संपन्न.


🛑बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे येथे करीयरच्या वाटा या वर कार्यशाळा संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

येथील जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचलित बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे येथे करीयरच्या वाटा या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत घुणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून माजी नौदल अधिकारी श्री सतीश नेवरेकर उपस्थित होते विद्यार्थी विद्यार्थिनी शालेय जीवनात कसा अभ्यास करावा व आपली ध्येय कशी साध्य करावीत यासाठी कोणकोणती क्षेत्र आहेत. यावर मोलांचे मार्गदर्शन केले विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या धेय्ययासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा झाली सदर कार्यक्रमास शाळेचे वरिष्ठ. शिक्षक रणजित सावंत लिपिक संदीप वाटवे विवियन मस्कारनेस गर्जना प्रतिष्ठानचे सुयश लाड व त्यांचे सहकारी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कालेकर यांनी केले तर आभार सचिन देशमुख यांनी मानले.

🛑 स्त्री शक्ती ग्रामसंघ बोलकेवाडी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.
( अनोखा उपक्रम.- विधवा महिलांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार.)

आजरा.- प्रतिनिधी.

बोलके वाडी तालुका आजरा येथील स्त्रीशक्ती ग्राम संघ यांच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी माजी सभापती रचना होलम होत्या. गावातील 13 बचत गटाच्या अध्यक्ष कोषाध्यक्ष सचिव लिपिक सह सर्व महिलांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन सी.आर. पी. नीता बोलके यांनी केले होते.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सौ होलम यांनी महिला सबलीकरण याबाबत महिलांना मार्गदर्शन करत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजेत. अलीकडे महिला सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत परंतु अजूनही काही महिला चूल व मूल या गोष्टीची बांधिलकी ठेवत आहेत. ही जबाबदारी आपली संपल्यानंतर आपण घरातून बाहेर पडून महिलांच्या मध्ये समाविष्ट होऊन आजची महिला ही काय करू शकते दाखवून दिले पाहिजे. आपल्या महिलांना कोणत्या अडचणी असतील तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्या आम्ही आपल्याला मदत करू असे बोलताना सौ होलम म्हणाल्या. आणि सीआरपी नीता बोलके यांनी प्रस्ताविका स्त्रीशक्ती ग्रामसंघ आयोजित हा हळदी कुंकू कार्यक्रम का भरवण्यात आला व त्याचा उद्देश काय याबाबतची माहिती दिली व एक अनोखा उपक्रम म्हणून गावातील विधवा महिला हळदीकुंकू कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकत नाहीत म्हणून या विधवा महिलांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. समाजात विधवा महिलांना स्थान निर्माण व्हावं यासाठी या महिलांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला असे सौ. बोलके यांनी सांगितले.
विधवा महिलांचा केला सन्मान केला यावेळी ग्रा.पंचायत सदस्य सरिता बोलके, शोभा बोलके, अमर डोंगरे, तसेच ग्रामसंघ महिला रुपाली कोलेकर, शितल बोलके, स्वप्नाली कातकर, सुवर्णा भादवणकर, वर्षा शेंडे, विद्या कातकर, प्रतिभा कोलेकर, रुपाली कातकर सह सर्व ग्रामसंघ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार सौ. बोलके यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.