🛑स्वामिनाथन अहवालाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव १९३ रुपये काजूला रास्त मिळावा. ( महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेचे आजरा तहसीलदारांना निवेदन.)
आजरा.- प्रतिनिधी.

काजू उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्याबाबत तालुकावार शेतकरी धरणे आंदोलन करत आजरा तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. राज्याच्या सिंधुदुर्ग कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन होते. शेतकऱ्यांनी काजू लागवड करून त्याची जोपासना केली आहे. परंतु आता शेतकर्याना काजूला अत्यल्प दर मिळू लागला आहे.
यामध्ये आपल्या कडील शेतकरी हवालदिल दिल होत होत आहे. काजू पिकच नष्ट होईल अशी परिस्थिती तयार झाली आहे याकडे शासनाचे धरणे धरून लक्ष वेधत आहोत. शेजारील गोवा राज्याच्या सरकारने काजू बिया ना रुपये १५० हमीभाव जाहीर केला आहे. आपल्या राज्यातील दापोली विद्यापीठाने काजू उत्पादनाचा खर्च १२९ रुपये प्रती किलो आहे. असे अभ्यासानंतर सांगितले आहे. अशा स्थितीत स्वामिनाथन अहवालाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव १९३ रुपये मिळणे रास्त आहे. सतत वाढत चाललेली महागाई लक्षात घेता शेतकर्याना २०० रुपये भाव मिळावा ही अत्यंत रास्त भूमिका आम्ही मांडत आहे.
त्यामुळे आम्ही पुढील प्रमाणे मागण्या करीत आहोत
१) महाराष्ट्र सरकारने काजू उत्पादक शेतकर्याना २०० रुपये हमी भाव जाहीर ताबडतोब जाहीर करा.
२) शेतीमाल आयातीबद्दल चे धोरण शेतकरी संरक्षक करा
३) आयात काजू वर ताबडतोब बंदी घाला.
या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हयातील आजरा तहसील कार्यालयावर धरणे कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकरी बंधूच्या वतीने आम्ही हे निवेदन देत आहोत तहसीलदार यांच्या माध्यमातून आपल्याकडे पाठवीत आहोत. यामधील
आम्ही मागण्या करीत आहोत की
१) आपण महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकर्याना किमान रुपये २०० प्रती किलो चा हमी भाव जाहीर करावा. २) महाराष्ट्र सरकारने जागोजागी काजू खरेदी केंद्रे उभारून काजू खरेदी करावी म्हणजे काजू उत्पादक शेतकऱ्यांना अत्यल्प दारात काजू बिया व्यापार्याना विकाव्या लागणार नाही. जगभरातून होणाऱ्या आयात काजू मुळे बाजारभाव कोसळल्या मुळे काजू उत्पादक शेतकरी
अडचणीत आला आहे. दराची ३-४ वर्षात २०० रुपये पासून ८०/९० रुपये पर्यंत घसरण झाली आहे. अनेकांचे बजेट कोलमडत आहे. आंदोलने करणे, दबाव वाढवणे या मार्गाने दर टिकवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. कोल्हापूर सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तीन जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात काजू झाडे आहेत. घरोघरी याची शेती होत असल्यामुळे दर कोसळल्यास त्याचे मोठे सामाजिक परिणाम होतात. महाराष्ट्रात या पट्ट्यात पिकणारा काजू गुणवत्तापूर्ण व चवीला चांगला आहे. त्याला चोखंदळ गिर्हाइकाची पसंती आहे. तरी आमच्या मागण्या मान्य व्हाव्या असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर
शांताराम पाटील, संजय घाटगे, नारायण भंडारे, शांताराम हरेर, निवृत्ती मिसाळ, जनाबाई धडइम, काशीनाथ मोरे, नारायण राणे, मनआप्पआ बोलके, दौलती राणे, यांच्या सह्या आहेत. या आंदोलनात तालुक्यातील काजू उत्पादक शेतकरी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
🛑आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा लोकसभा निवडणुकीत तुमच्या विरोधात मतदान करावे लागेल.- सर्व श्रमिक महासंघाचे थेट मोदींना आवाहन.
आजरा.- प्रतिनिधी.

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती व संयुक्त किसान मोर्चा यांचे संयुक्त मार्गदर्शनाप्रमाणे केंद्र सरकारच्या जन विरोधी धोरणाचा पर्दाफाश करण्यासाठी शुक्रवार १६ फेब्रुवारी २०२४ तालुकास्तरीय संप मोर्चाचे देशभरातील सर्व कामगार संघटना व शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या जन विरोधी धोरणाचा पर्दाफाश करण्याचे धोरणाप्रमाणे आजरा येथील सर्व श्रमिक महासंघ वतीने
आजरा तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सरकारी, सहकारी खाजगी उद्योग नोकरीमध्ये सर्वत्र मानधनी, कंत्राटी, फिक्स टर्म नोकऱ्या आणून कामगार कायदे मोडण्याची रचनाच राज्यकर्त्यानी तयार केली. सरकार व मालक याचा गैरफायदा घेऊन अमानुष पिळवणूक करत आहेत. व स्वतःची मालमत्ता वाढवत आहेत. आता कायदेच नष्ट करून ४ श्रम संहिता आणण्याचा सरकारचा डाव आम्ही सतत विरोध केल्यामुळे पुरा झालेला नाही.
शेती माल कवडी मोलाने घेता यावा व तो साठवून नफेखोरी करता यावी यासाठी ३ शेती कायदे आपल्या सरकारने आणले, पण संयुक्त किसान मोर्चा च्या आंदोलनामुळे सरकारचा हा डाव देखील साधला नाही.
अन्नधान्य महाग आहे. रेशन नष्ट करीत आहेत. शिक्षण व्यवस्था उध्वस्त करून मुले मुली शिक्षणाबाहेर ढकलली जात आहेत. देशविघातक खोट्या कल्पना मुरवणारे शिक्षण आणले जात आहे. आरोग्य व्यवस्था खिळखिळी केली आहे. देशाची संपत्ती कवडीमोलाने मुठभर
भांडवलदारांना विकण्याचा सपाटाच आपल्या सरकारने लावला आहे. त्यामुळे तो भांडवलदारांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. उद्द्योग धंदे नष्ट होत आहेत. प्रचंड बेकारी वाढली आहे. शेती परवडत नाही. युवक युवती शेतकरी कष्टकरी यांच्या आत्महत्यांच्या बातम्या सतत येत आहेत. चंगळखोरी व दैन्य दारिद्र्य अशी विषमता दिसत आहे. समाजातील असंतोष वाढत आहे. दुसरी कडे जुनाट मताच्या या पक्षाच्या सरकारच्या कार्यकालात अल्पसंख्यांकांवर देशात सर्वत्र हल्ले होत आहेत. सरकार याकडे लक्षच देत नाही. महिलांचा सन्मान नष्ट करणारी व अत्याचारी प्रवृत्ती सरकारच्या छत्राखाली वाढते आहे, दलित अल्पसंख्यांकांवरील महिलांवरील हल्ले वाढत आहेत. आर्थिक अडचणीतील समाज आरक्षणाच्या मागणीसाठी प्रचंड मोठी आंदोलने करीत आहेत. गुंडगिरी गोळीबार असे प्रकार दिवसाढवळ्या पोलिसांसमक्ष होत आहेत. विरोधी आमदार खासदार याना धमकावून किंवा खरेदी करून सतापक्ष आपली सता मिळवीत आहेत. संविधानाला धोका तयार झाला आहे. या आर्थिक सामाजिक असंतोषाचा आपल्यावर परिणाम होवू नये म्हणून सत्ताधारी वेगवेगळ्या जन विभागात भांडणे लावत आहेत, धार्मिक उन्माद निर्माण करीत आहेत, खोटा राष्ट्रवादी मुखडा लावून परदेशाशी हातमिळवणी करणार्या भांडवलदारांना पोसणारी धोरणे घेत आहेत. या सर्वाचा पर्दाफाश करून जनतेत जागृती करण्यासाठी कामगार कर्मचारी व शेतकरी संघटनांनी १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा संप करायची भूमिका घेतली आहे. तसेच जिल्हा व तालुका पातळीवर जमून धरणे मोर्चा निदर्शने करायचे ठरले आहे. आमची संघटना यात आपल्या मागण्या घेऊन सहभागी होत आहे. अण्णाभाऊ साठे म्हणत होते त्याप्रमाणे जग आपल्या कष्टकऱ्यांच्या हातावर तोलले आहे. सत्ताधाऱ्यांनी त्यांची भूमिका बदलली नाही. व आपले प्रश्न सोडवले नाही तर सत्ताधाऱ्यांना अद्दल घडवायला सुद्धा आपण कमी करणार नाही असा विचार करुया. यामधील आमच्या मागण्या आहेत की
१) गिरणी कामगाराना मुंबईतच मोफत घरे द्या
२) नगरपालिका कामगारांचा आकृतीबंध दुरुस्त करा, कंत्राटी कामगारांना कायम करा, कामगार कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करा. लाड पागे आरक्षण मिळावे यासाठी वटहुकुम काढा, नपा मनापा कामगारांना मोफत घरे द्या.
३)सावकारी गुंडगिरी पासून सहकारी पत संस्थाना संरक्षण द्या, बैंक पतसंस्था ठेविना संपूर्ण विमा संरक्षण द्या, बैंक पत संस्था वसुली कामी शासकीय कार्यालयातील दप्तर दिरंगाई टाला, वसुली कर्मचारी सुरक्षेसाठी पोलीस टास्क फोर्स करा.
४) साखर कामगारांची सर्व कायदेशीर देणी मिळालीच पाहिजेत.
५) सर्वाना २६००० किमान वेतन द्या. महागाई भत्ता द्या. सर्व असंघटीताना कल्याणकारी मंडळ द्द्या. कंत्राटी, मानधनी, निश्चित काळासाठी नेमणूक, नैमित्तिक नेमणूक या पद्धती बंद करून कायम रोजगार द्या. रोजगार हमी मधून किमान २०० दिवसाचा रोजगार द्या. दैनिक वेतन
रुपये ६०० करा. कल्याणकारी कायद्यांचा हक्क सर्वाना द्या. ६) सर्वाना इ एस आय योजना लागू करा. किमान ९००० पेन्शन व महागाई भत्ता द्या.
७) सर्वाना पूर्ण वेतनावर पेन्शनचा हक्क द्या.
८) ४ श्रम संहिता रद्द करा, कामगार कायद्यांची कठोर अंमल बजावणी करा.
९) रोजगाराचा हक्क मुलभूत हक्क म्हणून द्या, सरकारी पदे कायम स्वरूपी भरा.
१०) शेत मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्या. खरेदीची हमी तयार करा. शेती कर्जे माफ करा,
११) रेल्वे, बंदरे, विमानतळ, रस्ते, धरणे, वीज, कोळसा, लोखंड पोलाद, बँका विमा, खनिज
तेल, संरक्षण याचे खाजगीकरण रद्द करा.
१२) शिक्षण व आरोग्य यावर जीडीपी च्या अनुक्रमे ६% व ३% खर्च करा. शिक्षण व आरोग्य
याचे खाजगीकरण रद्द करा. शिक्षणाचे भगवेकरण थांबवा. १३) महागाई कमी करा, रेशन व्यवस्था बळकट करा. कर कमी करून स्वस्त गस पेट्रोल डीझेल वीज द्या.
१४ ) भारतीय राज्य घटनेतील लोकशाही, समानता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, वैद्न्यानिक दृष्टीकोन, संघराज्य पद्धती, राज्याचे विशेष अधिकार याचे संरक्षण करा. त्या तत्वाप्रमाणे शासनाचा व्यवहार करा.
१५) अल्पसंख्यांक, दलित, महिला, आदिवासी यांचेवरील अत्याचार थांबलेच पाहिजे.
आम्ही आपल्याला इशारा देत आहोत की आपण जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर नाइलाजाने आम्हाला निवडणुकीत तुमच्या विरोधात मतदान करावे लागेल. असे महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ यांच्या वतीने व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर शांताराम पाटील, संजय घाटगे, काशिनाथ मोरे, नारायण भडांगे, नारायण राणे, शांताराम हरेर, मनप्पा बोलके, निवृत्ती मिसाळ, दौलती राणे जानबा धडाम. सह अंगणवाडी सेविका मदतनीस छाया तिप्पट, शशिकला रेडेकर, छाया सदाशिव कांबळे, माया देसाई, छाया कुंभार वैशाली कांबळे, छाया मधुकर कांबळे, माधुरी कुंभार श्रमिक एकटू महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ पदाधिकारी यांच्या सह्या आहेत. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी व नाम. स्मृती इराणी मंत्री महिला व बाल विकास यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
🛑व्यंकटराव महाविद्यालयात कार्यशाळा उत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील व्यंकटराव महाविद्यालयात येथे कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष शेळके होते. व्यंकटराव कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण शिक्षक व विद्यार्थी भूमिका विषयी कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, दि. १३ रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्नीत व देवचंद कॉलेज अर्जुननगर, अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत “नवीन शैक्षणिक धोरण : शिक्षक व विदयार्थ्यांची भूमिका ” याबाबत सदर कार्यशाळेचे उद्घाटन आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यशाळा ही दोन सत्रात संपन्न झाली. पहिल्या सत्रांचे संसाधन व्यक्ती तु. कृ. कोलेकर महाविद्यालय नेसरीचे मा. प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर सर यांनी नवीन शैक्षणिक धोरण : शिक्षकांची भूमिका कशी असावी, विज्ञान- तंत्रज्ञान धोरणांच्या आधारे नवीन आकृतीबंध तयार असून, नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना ५० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. स्वायत्त व रिसर्च विद्यापीठे स्थापन होणार असून प्रत्येकाने कौशल्यपूर्ण शिक्षण घेवून सक्षम झाले पाहिजे सर्व भाषा आत्मसात परिपूर्ण तंत्रज्ञानाने डिजीटल युगात स्वःताला अपडेट करावे लागणार आहेत असे मार्गदर्शनातून स्पष्ट केले. दुसऱ्या सत्राचे संसाधन व्यक्ती कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी तथा संचालक मौनी विद्यापीठ गारगोटीचे मा. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सर यांनी नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थाची भूमिका कशी असावी करियर करण्यासाठी भाषा, व्यक्तिमत्वाची गरज नसून, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास असेल तर यश नक्कीच मिळते कारण शिक्षणामुळे उंची वाढते आपल्यामध्ये असणारे सुफ्त गुण ओळखून उतुंग भरारी घेता येते. परिस्थीती हि लढायला शिकवते त्यातूनच आवडीच्या क्षेत्रात नावलौकीक करता येतो यासाठी धीरूभाई अंबानी, रतन टाटा, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांच्या उदाहरणातून दाखवून दिले आज विद्यार्थ्यांना शिक्षणाची विविध दालने खुली आहेत व आवडीच्या क्षेत्रात करीअर करता येथे असे आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले. संसाधन व्यक्तींचा सत्कार शिंपी साहेबांच्या हस्ते केला उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार प्राचार्य डॉ. शेळके सर व समन्वयक प्रा. खामकर यांनी केले. शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये शेळके सर यांनी महाविद्यालयाची वाटचाल, धोरणे व कार्यशाळेचे महत्व काय आहे यांचे अभिभाषण केले. या कार्यशाळेसाठी उपस्थित सर्व मान्यवर संचालक, तसेच अग्रणी महाविद्यालय अंतर्गत सहभागी डी. आर. माने कॉलेज, कागल कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी, देवचंद कॉलेज अर्जुननगर, दूधसाखर महाविद्यालय बिद्रीचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी, व्यंकटराव कॉलेजचे प्राचार्य कुंभार सर पर्यवेक्षिका शेलार मॅडम, ज्युनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी तसेच व्यंकटराव महाविद्यालाचे सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही कार्यशाळा यशस्वी करणेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सी. एस. पन्हाळकर सर व प्रा. सौ. डी. आर. डोंगरे मॅडम यांनी केले तर आभार प्रा. एस. बी. खामकर यांनी मानले.
