🛑ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू;.- फेसबुक लाईव्हनंतर हल्लेखोराचीही आत्महत्या.
मुंबई:- प्रतिनिधी.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला.यामध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पूत्र आहेत.दरम्यान,हल्लेखोरानेही फेसबुक लाईव्हनंतर स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर, हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते चिरंजीव असून उपचारासाठी त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर शिवसेनेच्या यूबीटी गटाच्या शिवसनिकांनी निषेधार्थ मॉरीसच्या कार्यालयाची पूर्णपणे तोडफोड करण्यात आली आहे.या घटनेनंतर दहिसर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे या ठिकाणी आता अतिरिक्त पोलिस बळ मागवत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
🟥पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. दहिसर येथे ही घटना घडली असून अभिषेक घोसाळकर यांना करूणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे.
मुरीस भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणत होता.एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय.दरम्यान हल्लेखोर मोरीस यांनीही फेसबुक लाईव्हनंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने त्याचा ही मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अभिषेक यांची हत्या ही पूर्वनियोजित असल्याचा तपास अधिकाऱ्यांचा संशय असून दहिसर पोलीस तसेच क्राइम ब्रांच या प्रकरणी तपास करत आहे.
🛑कोण आहेत अभिषेक घोसाळकर?
अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकर हे दोनदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दहिसरमधील तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांची प्रतिमा आहे. घोसाळकर हे दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर 7 चे नगरसेवक होते. सध्या हा वॉर्ड शितल म्हात्रे यांच्याकडे आहे. सध्या घोसाळकर यांची पत्नी वॉर्ड नंबर 1 ची नगरसेविका होती.
🛑राज्यात गुंडांचं सरकार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अभिषेक घोसाळकर आताच माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेले. आता बातमी आली त्याच्यावर गोळीबार झाला. काय चाललय या राज्यात? गुंड्याचं सरकार बसलंय. एका आमदाराने गोळी घातली, ती पण पोलीस स्टेशनमध्ये. दोन्ही बाजूने गुंडागर्दी चालू आहे, हे सरकार उलथून लावावं लागेल. मिंधेला बदनाम करायची गरज नाही, ते बदनामच आहे, पण त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय.
