HomeUncategorizedश्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सर्फनाला धरणाचे काम बंद करण्याचे आंदोलन स्थगित.- २०...

श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सर्फनाला धरणाचे काम बंद करण्याचे आंदोलन स्थगित.- २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीचे लेखी पत्र.👇👇

श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सर्फनाला धरणाचे काम बंद करण्याचे आंदोलन स्थगित.- २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीचे लेखी पत्र.👇👇

आजरा.- प्रतिनिधी.‌

२० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीचे लेखी पत्र मिळाल्याने आज श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सर्फनाला धरणाचे काम बंद करण्याचे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्फनाला प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे रखडलेले प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक न झाल्यास आज मोर्चाने येऊन धरणाचे काम बंद करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दल प्रणित सर्फनाला धरणग्रस्त संघटनेने दिला होता. या पार्श्वभूमीवर आज धरणस्थळावर कॉ संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्त स्त्री पुरुष मोठ्या संख्येने जमले होते. सकाळी अकरा वाजता धरणग्रस्त स्त्री पुरुष जमल्यानंतर त्यांनी “आधी पुनर्वसन मगच धरण”, “जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची” अशा घोषणानी परिसर दणाणून सोडला. याच दरम्यान कोल्हापूर पाटबंधारे परिमंडळचे अधीक्षक अभियंता म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांच्यासह पाटबंधारेचे अनेक अधिकारी तेथे आले.
यावेळी बोलतांना कॉ संपत देसाई म्हणाले की, आमच्या कांही महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी आम्ही पूर्वसूचना देऊनही आपण प्रश्न सोडवण्यासाठी हालचाल न झाल्याने आज आम्ही याठिकाणी धरणाचे काम बंद करण्यासाठी आलो आहोत. आमचे प्रश्न न सोडवता दडपशाहीने धरणाचे काम पुढे रेटण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो उधळून लावू जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक होऊन पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम दिला जात नाही तोपर्यंत धरणाचे काम होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून बोलताना अधीक्षक अभियंता श्री म्हेत्रे म्हणाले की जिल्हाधिकारी नव्याने रुजू झाले आहेत त्यांना प्रश्न समजून घ्यायला वेळ लागेल तरीही त्यांनी २० तारखेला बैठक घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आमची आपल्याला विनंती राहील असे सांगून त्यांनी बैठकीचे लेखी पत्रच दिले.
२० तारखेला होणाऱ्या बैठकीपूर्वी पारपोली येथे १४ तारखेला पूर्व तयारीची बैठक प्रांताधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्यासोबत घेण्याचेही ठरविण्यात आले. बैठकीचे लेखी पत्र दिल्यानंतरच आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याची घोषणा श्रमुदचे कार्यध्यक्ष कॉ संपत देसाई यांनी केली. यावेळी कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उपअभियंता यांच्यासह अशोक मालव, संतोष पाटील, प्रकाश कविटकर, प्रकाश शेटगे, हरी सावंत, कृष्णा ढोकरे, श्रावण पोवार, गोविंद पाटील, धोंडिबा सावंत, ज्ञानेश्वर गुंजाळ, ज्ञानेश्वर ढोकरे, मारुती ढोकरे यांचायसह धरणग्रस्त स्त्रीपुरुष मोठ्या संख्येने हजर होते. ठाणे अंमलदार दत्ता शिंदे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.