HomeUncategorizedकेंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ही योजना आजरा शहरासाठी लागू.-...

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ही योजना आजरा शहरासाठी लागू.- नगरपंचायतीच्या बांधकाम विभागामध्ये अर्ज उपलब्ध.

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ही योजना आजरा शहरासाठी लागू.- नगरपंचायतीच्या बांधकाम विभागामध्ये अर्ज उपलब्ध.

आजरा.- प्रतिनिधी .

आजरा नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना कळविणेत नगरपंचायत कडून सुचित करणे बाबत मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ही योजना आजरा शहरासाठी लागू झाली आहे. या योजनेअंतर्गत सर्व प्रवर्गातील, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील बेघर कुटुंबांना त्यांच्या स्वमालकीच्या जागेवर नवीन घरकुल बांधणेस केंद्र शासनाकडून १.५ लक्ष व राज्य शासनाकडून १.० लक्ष असे प्रतिलाभार्थी एकुण २.५ लक्ष अनुदान प्राप्त होणार आहे. आजरा नगरपंचायतीमार्फत या योजनेचा पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल (पहिली यादी) बनविणेची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी, आजरा नगरपंचायत यांचेद्वारे करणेत येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज आजरा नगरपंचायतीच्या बांधकाम विभागामध्ये उपलब्ध आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची पात्रता प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या मार्गदर्शक सूचनानुसार व वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार राहील.
(सूरज दि. सुर्वे) कर निरीक्षक मुख्याधिकारी आजरा नगरपंचायत आजरा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.