HomeUncategorizedबातमी रिझल्ट सह्याद्री न्युज.आल्याच्यावाडीत पिसाळलेल्या माकडा कडून आठ जणांना चावा.- अखेर त्या...

बातमी रिझल्ट सह्याद्री न्युज.आल्याच्यावाडीत पिसाळलेल्या माकडा कडून आठ जणांना चावा.- अखेर त्या माकडावा केलं वनविभागाने जेरबंद.

बातमी रिझल्ट सह्याद्री न्युज.
आल्याच्यावाडीत पिसाळलेल्या माकडा कडून आठ जणांना चावा.- अखेर त्या माकडावा केलं वनविभागाने जेरबंद.

आजरा – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील आल्याच्यावाडीत पिसाळलेल्या माकडा कडून लहान मुलांसह नागरिकांना चावा घेत आठ जणांना जखमी केले होते. यापूर्वी देखील या ठिकाणी असे प्रकार घडले आहेत याबाबत तक्रार करून देखील वनविभाग दुर्लक्ष करत नसल्याचे नागरिकांचे मत होते. दि.२४ रोजी या गावातील माडभगत व मुळीक या कुटुंबातील नागरिकांना ओरबाडून, चावा घेऊन जखमी केले होते. वन विभागाचे कर्मचारी जाऊन पाहणे करतात पण त्या माकडावर उसकलने किंवा बेशुद्ध करून दूर जंगलात सोडण्याचे काम वन विभागाचे होते. पण ही जबाबदारी घेऊन वन विभागाने कोणतेही पाऊल उचलले नव्हते. याबाबत येणाऱ्या दोन दिवसात संबंधित माकडाचा बंदोबस्त नाही केल्यास. वनविभागासमोर येऊन निदर्शने करणार असल्याचे माजी उपसरपंच देवराज माडभगत यांनी बोलताना सांगितले होते. लागलीच दुसऱ्या दिवशी वनविभागाच्या कर्मचारी यांनी आवाज उठवल्यानंतर अखेर त्या पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त वन विभागाने केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.